उत्तर कोल्हापुरची जागा काँग्रेससाठी सोडणं वेदनादायी : राजेश क्षीरसागर

Rajesh Kshirsagar
Rajesh KshirsagarEsakal
Updated on

कोल्हापूर उत्तर विधानसभा (Kolhapur North Election 2022) पोटनिवडणुकीत मविआत बंडाळी होण्याची शक्यता आहे. ज्यांनी सेनेचे ५ आमदार पाडले, त्यांच्यासाठी जागा सोडणं हे मनाला लागलं. निवडणूकीत पराभवानंतर डगमगलो नाही. मात्र उत्तर कोल्हापुरची जागा काॅंग्रेससाठी सोडणं याचं दु:ख वाटतंय अशी खंत शिवसेनेचे माजी आमदार राजेश क्षीरसागर (Rajesh Kshirsagar) यांनी व्यक्त केली. कोल्हापूर उत्तर विधानसभा मतदारसंघाच्या पोटनिवडणुकीसाठी उमेदवारांची घोषणा झाल्यानंतर आज कोल्हापुरात (Kolhapur) शिवसेना कार्यकर्त्यांसमोर त्यांनी खदखद व्यक्त केली. यावेळी राजेश क्षीरसागर यांनी निवडणूक लढवावी यासाठी त्यांच्या घरासमोर शिवसैनिकांनी गर्दी केली व निवडणूक लढवावी अशी घोषणा केली.

गेल्या दोन दिवसापासून नाॅट रिचेबल असलेल्या क्षीरसागर यांनी माध्यमांशी संवाद साधला. मात्र महाविकास मेळाव्याला राजेश क्षीरसागर यांनी दांडी मारली होती. त्यांच्या अनुपस्थितीमुळे राजकीय पटलावर जोरदार चर्चा सुरु आहे.

शिवसेना कार्यकर्त्यांसमोर क्षीरसागर म्हणाले, २०१९ च्या पराभवानंतर डगमगलो नाही. सेनेचं काम करत राहिलो. काॅंग्रेस आणि राष्ट्रवादी गरज असते तेव्हा सेनेशी युती करतात असा आरोप यावेळी त्यांनी केला. कोल्हापूर उत्तर विधानसभा पोटनिवडणूक तिरंगी व्हायला हवी होती अशी नाराजी व्यक्त केली.

नाराजी व्यक्त करताना ते म्हणाले, २०१९ च्या निवडणुकीत निवडून आल्यानंतर मी पालकमंत्री होईन या भीतीमुळे सर्वांनी एकत्रित येऊन माझा पराभव केला. उत्तरची पोटनिवडणूक तिरंगी व्हायला हवी होती परंतु, ही जागा काँग्रेसला सोडण्यात आल्याचे मोठे दु:ख होत आहे अशी नाराजी व्‍यक्‍त करत शिवसेनेला न्याय कधी मिळणार असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला. दरम्यान, शिवसैनिकांनी घोषणाबाजी करत निवडणूक लढविण्याचा आग्रह धरला. आता क्षीरसागर कोणती भूमिका घेणार ? महाविकास आघाडीत बंडाळी होणार का ? याकडे जिल्ह्याच्या राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले आहे.

कोल्हापूर उत्तरच्या पोटनिवडणुकीतील जागेवर शिवसेना (Shivsena) व काँग्रेस (Congress) या महाविकास आघाडीतील दोन पक्षांतच चुरस निर्माण झाली आहे. मुंबईत झालेल्या बैठकीत दोन्हीही पक्षाचे नेते आपआपल्या भुमिकेवर ठाम होते. मात्र बैठकीनंतर ही जागा कॉंगेसला देण्याचा निर्णय मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांनी घेतला. यामुळे क्षीरसागर नाराज झाल्याचे बोलले जात आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.