राज्यात बीआरएस पक्षाला थारा मिळणार नाही. जनतेची कास महाराष्ट्राच्या विचारांसोबत आहे.
सातारा : लांबून गप्पा मारणाऱ्या राऊतांनी माझ्या मतदारसंघात येऊन राहावे. त्यांच्या जेवणा-खाण्याची सगळी चांगली व्यवस्था करतो. दुसऱ्याच्या खांद्यावर बंदूक ठेऊन बोलण्यापेक्षा संजय राऊतांनी स्वत: माझ्याविरोधात उभे राहावे, अशी टीका पालकमंत्री शंभूराज देसाई (Shambhuraj Desai) यांनी केली.
उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेचे खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनी काल पाटणमध्ये येऊन पालकमंत्री देसाई यांच्यावर टीका केली होती. त्या टीकेला शंभूराज देसाई यांनी उत्तर दिले.
खासदार राऊत यांनी मंत्री देसाई यांच्या मतदारसंघात काल सभा घेऊन गद्दारांच्या भूकंपाचा केंद्रबिंदू पाटण असल्याचे सांगत हा २०२४ ला खोडून काढू, अशी टीका केली होती. या टीकेला देसाई यांनी उत्तर दिले.
ते म्हणाले,‘‘ लांबून गप्पा मारणाऱ्या राऊतांनी माझ्या मतदारसंघात येऊन राहावे आणि माझ्याविरोधात उभे राहून दाखवावे. त्यांच्या जेवणा-खाण्यासह सगळी चांगली व्यवस्था करतो. या राहा, तुमचे विचार आमच्या लोकांना सांगा. त्यांना खूप मोकळीक आहे, ठरवा २०२४ मध्ये काय होतंय ते.
त्यांनी दुसऱ्याच्या खांद्यावर बंदूक ठेऊन बोलण्यापेक्षा स्वत: माझ्याविरोधात उभे राहावे. माझ्या मतदारसंघातील सामान्य मतदार दूध का दूध आणि पाणी का पाणी करून दाखवतील.’’ सी. चंद्रशेखर राव यांच्या महाराष्ट्र दौऱ्याच्या पार्श्वभूमीवर बीआरएस पक्षावर शिवसेनेचे नेते आणि मंत्री देसाई यांनी टीका केली आहे.
ते म्हणाले,‘‘ राज्यात बीआरएस पक्षाला थारा मिळणार नाही. जनतेची कास महाराष्ट्राच्या विचारांसोबत आहे. महाराष्ट्राला राजकीय विचार देणारे अनेक दिग्गज नेते, अनेक पक्ष महाराष्ट्रात झाले आणि आजही आहेत. महाराष्ट्रातली जनता सुज्ञ आहे. राज्याचा विकास कशात आहे, राज्यातील सामान्य माणसाचे हित कशात आहे, लोकाभिमुख कारभार कुठलं सरकार करतंय? हे समजण्या इतपत सुज्ञ जनता इथं आहे.’’
शेजारच्या राज्यातील कोणता तरी पक्ष आपल्याकडे येणार आणि इथे काही भासवण्याचा प्रयत्न करणार, याचा काहीही परिणाम राज्यात होणार नाही. तेलंगणचे मुख्यमंत्री चंद्रशेखर राव यांच्यासह संपूर्ण मंत्रिमंडळ जरी आलं तर महाराष्ट्र आपल्या राज्याचे विचार सोडून दुसऱ्या राज्यातील विचारांची कास धरेल, असं वाटत नाही.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.