Shiv Sena MLA Disqualification Case: आमदार अपात्रतेबाबत लवकरच फैसला! पुढच्या आठवड्यात सुनावणीला सुरुवात

विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर हे ही सुनावणी घेणार आहेत.
Shiv Sena MLA Pratap Sarnaik cheated of Rs 7 crore 66 lakh marathi Crime News
Shiv Sena MLA Pratap Sarnaik cheated of Rs 7 crore 66 lakh marathi Crime News esakal
Updated on

नवी दिल्ली : शिवसेनेच्या आमदार अपात्रतेबाबत एक मोठी अपडट समोर आली आहे. त्यानुसार पुढच्या आठवड्यापासून दररोज प्रत्येक आमदाराची प्रत्यक्ष सुनावणी होणार आहे. विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर हे प्रत्यक्ष ही सुनावणी घेणार आहेत.

याप्रकरणी ठाकरे गटाच्या १४ आमदारांनी यापूर्वीच लेखी उत्तर सादर केलं आहे. साम टीव्हीनं याबाबत वृत्त दिलं आहे. (Shiv Sena MLA Disqualification case regular hearing will be from next week by Speaker Rahul Narvekar)

Shiv Sena MLA Pratap Sarnaik cheated of Rs 7 crore 66 lakh marathi Crime News
Rahul Gandhi Birthday: स्वत:चे घरही नसलेल्या राहुल गांधींकडे किती आहे संपत्ती?

विधीमंडळातील सुत्रांच्या माहितीनुसार, शिवसेना आमदारांवरील अपात्रतेची कारवाई पुन्हा वेग येणार आहे. शिवसेनेच्या दोन्ही गटातील आमदारांची सुनावणी लवकरच सुरु होण्याची शक्यता आहे.

पुढील आठवड्यात शिंदे गटातील आमदारांची म्हणणं मांडण्याची मुदत संपणार आहे. याआधी विधानसभा अध्यक्षांनी त्यांना २ आठवड्यांची मुदत दिली होती. ठाकरे गटाच्या १४ आमदारांनी याआधीच आपलं लेखी उत्तर सादर केलं आहे. (Latest Marathi News)

Shiv Sena MLA Pratap Sarnaik cheated of Rs 7 crore 66 lakh marathi Crime News
माथेरानसाठी उठवू सारे रान; जंगल वाचवण्यासाठी ‘एक हात मदतीचा’

विशेष म्हणजे शिंदे आणि ठाकरे अशा दोन्ही गटांचं लेखी उत्तर प्राप्त झाल्यानंतर शिवसेनेच्या प्रत्येक आमदाराची सुनावणी होणार आहे. विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर हे स्वतः ही सुनावणी घेणार आहेत. ठाकरे गटाच्या आमदारांपासूनच या सुनावणीला सुरुवात होणार आहे, अशी माहिती सूत्रांकडून मिळते आहे. (Marathi Tajya Batmya)

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.