MLA Disqualifications: अपात्रतेबाबत 25 सप्टेंबरला सुनावणी; ठाकरे-शिंदे आमने-सामने येणार? नार्वेकरांचे संकेत

सुप्रीम कोर्टाच्या निर्देशांनंतर या सुनावणीच्या हालचालींना आता वेग आला उद्या ठाकरे-शिंदेंना नोटीस पाठवण्यात येणार आहे.
thackeray vs shinde
thackeray vs shinde Esakal
Updated on

मुंबई : शिवसेना आमदारांच्या अपात्रतेच्या सुनावणीला उशीर होत असल्यानं सुप्रीम कोर्टानं विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांना झापल्यानंतर आता सुनावणीच्या घडामोडींना वेग आला आहे. १४ सप्टेंबर रोजी सुनावणी पार पडल्यानंतर ती दोन आठवडे पुढे ढकलण्यात होती पण आता सुप्रीम कोर्टाच्या निर्देशांनुसार २५ सप्टेंबर रोजी सुनावणी घेण्यात येणार आहे.

विशेष म्हणजे या सुनावणीवेळी शिवसेनेच्या दोन्ही गटांचे प्रमुख उद्धव ठाकरे आणि एकनाथ शिंदे समोरासमोर येण्याची शक्यता आहे. स्वतः नार्वेकर यांनी याचे संकेत दिले आहेत. (Shiv Sena MLA Disqualification Hearing on September 25 Thackeray Shinde will face eachother)

thackeray vs shinde
Sanatana Dharma: 'सनातन धर्म' वादाची सुप्रीम कोर्टाकडून दखल; तामिळनाडू सरकार अन् स्टॅलिन यांना पाठवली नोटीस

दिल्ली दौऱ्यात काय झालं?

दिल्ली दौऱ्याबाबत नार्वेकर म्हणाले, "माझा हा पूर्वनियोजीत दौरा होता. त्यातल्या काही भेटीगाठी कायदेतज्ज्ञांसोबत होत्या. अपात्रतेच्या संदर्भातील कायदा हा बदलत जाणारा कायदा आहे. परिस्थितीनुसार त्यात बदल होत असतात. सुप्रीम कोर्टात झालेली याचिका आणि आदेशात कुठले बदल होणे अपेक्षित आहे किंवा त्याची अंमलबजावणी कशा योग्य पद्धतीनं व्हायला पाहिजे अशी चर्चा झाली" (Latest Marathi News)

thackeray vs shinde
Rahul Gandhi on OBC: संसदेतील खासदार केवळ पुतळे, ओबीसी देश चालवत नाहीएत; राहुल गांधींचा मोदींवर निशाणा

दोन्ही पक्षांना बोलावण्यात येणार

सुप्रीम कोर्टानं एका आठवड्यात पुढील सुनावणी घेण्यासंदर्भात निर्देश दिलेले होते. तशीही आमची सुनावणी १४ तारखेला झालेली होती आणि पुढील सुनावणी प्रस्तावित होती. त्यामुळं येत्या आठवड्यात आम्ही सुनावणी घेऊन निर्णय घेऊ. गरज पडली तर दोन्ही पक्षांच्या प्रमुखांना बोलावण्यात येईल, असं नार्वेकर यांनी माध्यमांशी बोलताना सांगितलं. (Marathi Tajya Batmya)

thackeray vs shinde
Video: भाजप कार्यालयात पंतप्रधानांचं भव्य स्वागत; मोदींनी झुकून व्यक्त केला महिलांप्रती आदर

निर्णयाला दिरंगाई करणार नाही

सध्या हा विषय न्यायप्रविष्ठ आहे तसेच मीच यावर सुनावणी घेऊन निर्णय देणार असल्यानं यावर आत्ताच अधिक बोलणं योग्य ठरणार नाही. संविधानानं न्याय व्यवस्था, कायदे मंडळ आणि कार्यकारी मंडळांना आपलं कार्यक्षेत्र आखून दिलेलं आहे. त्या कार्यक्षेत्रात राहून सर्वांनी काम करणं अपेक्षित आहे.

सुप्रीम कोर्टानं देखील याबाबत योग्य आदेश दिलेले आहेत. निर्णय करायला मी दिरंगाई करणार नाही पण कुठलीही घाई करणार नाही. कायदेशीर, संविधानिक तरतुदींचं पालन करुनच हा निर्णय घेईन. राष्ट्रवादीकडून पूर्वीच्या याचिका आल्या आहेत तेवढ्याबद्दलच मला माहिती आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.