राज्यात भाजप-शिंदे गटाचं सरकार आल्यानं राजकीय घडामोडींना वेग आलाय.
मुंबई : गेल्या अनेक दिवसांपासून सुरू असलेलं राजकीय नाट्य अखेर संपलंय. एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) यांनी महाराष्ट्राचे 30 वे मुख्यमंत्री म्हणून पद आणि गोपनीयतेची शपथ घेतली. महाविकास आघाडीला फाटा देत एकनाथ शिंदे यांनी भाजपशी घरोबा (BJP) करत नवं सरकार स्थापन केलंय.
राज्यात भाजप-शिंदे गटाचं सरकार आल्यानं राजकीय घडामोडींना वेग आलाय. दरम्यान, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याबरोबर गेलेल्या शिवसेनेच्या (Shiv Sena) बंडखोर आमदारांना राज्य सरकारडून वाय प्लस दर्जाची सुरक्षा देण्यात आली. मात्र, हिंगोलीच्या कळमनुरीचे बंडखोर आमदार संतोष बांगर (MLA Santosh Bangar) यांनी ही सुरक्षा काढून घेण्यात यावी, असं पत्र जिल्हा पोलिस अधीक्षकांना (SP) दिलंय.
मात्र, पोलिस प्रशासनाकडून त्यावर कोणताही निर्णय घेण्यात आलेला नाहीय. त्यामुळं पोलिस आक्रमक बांगरांची सुरक्षा काढून घेणार की कायम ठेवणार, याकडं सर्वांचं लक्ष लागलंय. माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेतून तब्बल 40 आमदारांनी बंडखोरी करत एकनाथ शिंदे यांना उघड समर्थन दिलं. मात्र, राज्यातील शिवसैनिकांचा रोष पाहता या बंडखोर आमदारांना एकनाथ शिंदे यांच्या सरकारनं वाय प्लस दर्जाची सुरक्षा पुरवलीय.
परंतु, कळमनुरीचे शिवसेना आमदार संतोष बांगर यांनी आपली सुरक्षा काढून घेण्यात यावी, अशी विनंती जिल्हा पोलिस अधीक्षकांना केलीय. हिंगोली जिल्हा पोलिस अधीक्षकांना आमदार संतोष बांगर यांनी पत्र दिलंय. त्यात त्यांनी म्हटलंय की, आपल्याला प्रदान करण्यात आलेली वाय प्लस दर्जाची सुरक्षा काढून घ्या, अशी विनंती केली. मात्र, हिंगोली पोलिसांनी बांगर यांच्या पत्रावर अद्याप कोणताही निर्णय घेतला नसल्याची माहिती दिलीय.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.