मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी कानाखाली मारली तरी सत्ता सोडणार नाही, असं महाविकास आघाडी सरकारमधील एका मंत्र्याने मला सांगितलं होतं, असा खळबळजनक दावा भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी केला होता. चंद्रकांत पाटील यांच्या या वक्तव्यानंतर चर्चेला उधान आलं होतं. चंद्रकांत पाटील यांच्या या दाव्यावर शिवसेना खासदार संजय राऊत यांनी आपल्या खास शैलीत समाचार घेतला आहे. तसेच गुजरात मुख्यमंत्र्यांचा राजीनामा, गोवा आणि उत्तर प्रदेश निवडणुकीत शिवसेनेचा सहभाग यावरही आपलं मत व्यक्त केलं.
चंद्रकांत पाटील यांच्या वक्तव्यावर काय म्हणाले?
एक मंत्री कोण? असा हवेत गोळीबार करून चालणार नाही. आणि कोणी कुणाच्या थोबाडीत मारत नाहीत. चंद्रकांत पाटील किंवा भाजपचे अन्य कुणी अशा अफवा पसरवतात. यात त्यांना आनंद मिळतो. त्यांनी त्याचा आनंद घ्यावा. पण महाविकास आघाडीचं सरकार आणखी तीन वर्षे चालेल. त्यानंतरही महाविकास आघाडी पुन्हा सत्तेत येईल. त्याबाबत त्यांनी निश्चित राहावं.
उत्तर प्रदेश-गोव्यात महाविकासआघाडीचा प्रयोग-
उत्तर प्रदेशमध्ये शिवसेना निवडणूक लढणार आहे. गोव्यामध्ये शिवसेना निवडणूक लढतच आहे. 2017 मध्येही उत्तर प्रदेशमध्ये निवडणूक लढली होती. आता पुन्हा एकदा उत्तर प्रदेशमध्ये शिवसेना निवडणूक लढवणार आहे. उत्तर प्रदेशमध्ये जवळपास 90 जागावर शिवसेना निवडणूक लढणार आहे. गोव्यामध्ये 20 जागांवर शिवसेना लढणार आहे, असं संजय राऊत यांनी स्पष्ट केलं. पुढे बोलताना ते म्हणाले की, उत्तर प्रदेशमध्ये काही शेतकरी संघटना आहेत या संघटनांनी सांगितलेलं आहे की तुम्ही निवडणूक लढा आमचा तुम्हाला पाठिंबा आहे इतर काही लहान पक्ष आहेत त्यांनादेखील शिवसेनेला पाठिंबा द्यायचा आहे. गोव्यामध्ये देखील महा विकास आघाडी सारखा प्रयोग करण्याचा विचार आहे. त्याला कितपत यश येते त्यासंदर्भात निश्चित काही सांगता येणार नाही. पण त्या संदर्भात हालचाली सुरू आहेत . त्या महाविकास आघाडी मध्ये शिवसेनेला चांगले स्थान मिळालं, तर नक्कीच शिवसेना सहभागी होऊ शकेल .
विजय रुपानी यांच्या राजनाम्यावर काय म्हणाले राऊत?
गुजरातमधील भाजप मुख्यमंत्री विजय रुपानी यांच्या राजीनाम्यावर संजय राऊत यांनी प्रतिक्रिया दिली. ते म्हणाले की, एखाद्या राज्याचा मुख्यमंत्री बदलणे हा त्या राज्याचा पक्षाचा अंतर्गत विषय आहे. त्याच्यावरती इतरांनी भाष्य करण्याची गरज आहे. गुजरात राज्यामध्ये भारतीय जनता पक्षाची स्थिती तितकीशी बरी नाहीये .
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.