"नारायण राणे शिवसेना-भाजपला एकत्र आणण्याचे प्रयत्न करताहेत"

"नारायण राणे शिवसेना-भाजपला एकत्र आणण्याचे प्रयत्न करताहेत"
Updated on

मुंबई - जनआशीर्वाद यात्रेत महाराष्ट्रात जाऊन शिवसेनेवर चिखलफेक करा, असे मोदींनी सांगितलेले नाही. ते पंतप्रधानांचे आदेशही पाळत नसल्याचे सांगत शिवसेनेचे नेते खा. संजय राऊत यांनी नारायण राणेंवर निशाणा साधताना भाजपसोबत जिव्हाळ्याचे संबंध अजूनही शिल्लक असल्याचे दाखवून दिले. मात्र, बाहेरून येणाऱ्यांकडून शिवसेना-भाजप यांच्यातील संबंध बिघडविण्याचे प्रयत्न सुरु असल्याचा टोलाही हाणत केंद्रीय मंत्री नारायण राणे या दोन्ही पक्षातील भविष्यातील संवादाचे दरवाजे बंद करत असल्याकडे निर्देश केला. शिवसेना आणि भाजपमध्ये केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी केलेल्या वादग्रस्त विधानानंतर सलग तिसऱ्या दिवशीही आरोप प्रत्यारोपाच्या फैरी झडत राहिल्या. नारायण राणे यांची जनआशीर्वाद यात्रा आज पुन्हा सुरु झाल्यानंतर त्यांनी पुन्हा एकदा शिवसेनेवर निशाणा साधल्याने हा वाद अधिक कडवट होऊ लागला आहे.

शिवसेना-भाजप भविष्यात एकत्र येणार का?, असा प्रश्‍न माध्यमांनी विचारला, त्यावर राऊत यांनी उपरोधिक पद्धतीने, “नारायण राणे दोघांना एकत्र आणण्याचे प्रयत्न करताहेत, संबंध सुधारण्यासाठी प्रयत्न करत आहेत,’ अशी टीका केली. ‘‘राजकारणात यात्रा काढल्या पाहिजेत. लोकांचा पाठिंबा मिळवायचा आहे. पण त्यांना यात्रेचा हेतू कळला नाही. सरकार काय काम करत हे लोकांना सांगा, यासाठी यात्रा काढा अशी मोदींची इच्छा आहे. यावेळी संसदेचे कामकाज चालले नाही. काही कारणांमुळे अनेक गोष्टी लोकांपर्यंत गेल्या नाहीत. त्या लोकांना सांगा असे मोदींचे म्हणणे आहे. महाराष्ट्रात जा आणि शिवसेना आणि उद्धव ठाकरेंवर चिखलफेक करा, असे आदेश मोदींनी दिले नाहीत,’’ अशा शब्दांत राऊतांनी भाजपला सुनावले आहे.

"नारायण राणे शिवसेना-भाजपला एकत्र आणण्याचे प्रयत्न करताहेत"
टप्प्याटप्प्याने सगळे बाहेर काढणार - राणेंचा शिवसेनाला इशारा

भाजपमध्ये बाहेरून आलेल्या लोकांनी वातावरण बिघडविले, असा आरोपही संजय राऊत यांनी केला आहे. ‘‘तसेच आम्ही टीका करतो आणि सहनही करतो. टीकेला धार असली तरी ती स्वीकारतो. पण कंबरेखालचे वार कराल तर, कंबरेखाली तुम्ही सुद्धा आहात हे लक्षात ठेवा. भाषेची बरोबरी करू नका,’’ असा इशारा राऊत यांनी राणेंना दिला. तसेच भाजपने मुख्यमंत्र्यांना स्वातंत्र्यदिन कितवा होता हे लक्षात राहावे म्हणून ७५ हजार पत्रे पाठविणार आहे. अशा पत्रांचा आम्हाला काही फरक पडत नसल्याचे सांगत राऊत यांनी दुर्लक्ष केले.

"नारायण राणे शिवसेना-भाजपला एकत्र आणण्याचे प्रयत्न करताहेत"
पाऊस पुन्हा सक्रीय होणार, राज्यात पुढील पाच दिवस मुसळधार!

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.