बाळासाहेब अन् उद्धव ठाकरेंचा फोटो ट्वीट करून राऊत म्हणाले, रुकने वाला..

Sanjay Raut Latest Tweet
Sanjay Raut Latest Tweetesakal
Updated on
Summary

राज्यात सत्ताबदल झाल्यानंतर हे सरकार किती काळ टिकेल याबाबत शंका उत्पन्न होऊ लागल्या आहेत.

राज्यात सत्ताबदल झाल्यानंतर हे सरकार किती काळ टिकेल याबाबत शंका उत्पन्न होऊ लागल्या आहेत. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांनी तर राज्यात मध्यवधी लागतील, असं अगोदरच म्हटलंय. आता शिवसेना (Shiv Sena) खासदार संजय राऊत ( Sanjay Raut) यांनी देखील राज्यात विधानसभेसाठी मध्यवधी ( Mid-term Assembly Elections 2022) लागतील असं म्हटलंय. राज्यात सत्तांतरानंतर अनेक कायदेशीर पेच निर्माण झाले आहेत. ती लढाई न्यायालयात सुरुच राहिली. परंतु, आम्हीही मध्यवधी लागणार असे संकेत मिळत असल्यानं त्या दृष्टीनं लढाईसाठी तयारी करत असल्याचं राऊत म्हणाले.

या वक्तव्यानंतर आज शिवसेना नेते संजय राऊत यांनी ट्विटव्दारे पुन्हा एकदा इशारा दिलाय. राऊत यांनी ट्विटमध्ये लिहिलंय की, रुकने वाला वजह ढूंढ़ता हैं.. और जाने वाले बहाने... राहत..! असं नमूद करुन राऊतांनी हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांचा फोटो देखील शेअर केला आहे. त्यामुळं राऊत यांचा नेमका निशाणा एकनाथ शिंदेंवर तर नाही ना? अशी चर्चा रंगलीय. कारण, काल विश्वासदर्शक ठराव मंजूर झाल्यानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी जोरदार भाषण केलं. यावेळी एकनाथ शिंदे भावूक झाल्याचंही पाहायला मिळालं. इतकंच नाही तर आपल्या भाषणात त्यांनी शिवसेना खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांच्यावर जोरदार टीका केली. एकनाथ शिंदे आणि त्यांच्यासोबतचे आमदार गुवाहाटीतील (Guwahati) हॉटेलमध्ये मुक्कामी होते. त्यावेळी शिंदे आणि बंडखोर आमदारांनी आसाममधील प्रसिद्ध कामाख्या देवीचं दर्शन घेतलं. त्यावेळी शिवसेना खासदार संजय राऊत यांनी शिंदे आणि बंडखोर आमदारांवर जोरदार टीका केली होती. राऊत यांच्या टीकेलाही एकनाथ शिंदे यांनी प्रत्युत्तर दिलंय.एकनाथ शिंदे, उद्धव ठाकरे, देवेंद्र फडणवीसांची Property किती आहे माहितीय, जाणून घ्या श्रीमंत कोण? (Sanjay Raut Latest Tweet)

Sanjay Raut Latest Tweet
एकनाथ शिंदे, उद्धव ठाकरे, देवेंद्र फडणवीसांची Property किती आहे माहितीय?

आता कामाख्या देवीनं कुणाचा बळी घेतला?

मी एक मंत्री शेवटी, मला काय माझ्या वरिष्ठांनी कधीही काढलं असतं. पण मी कधीही घाबरलो नाही. काढा काहीही करा. पण माझा जो अजेंडा आहे तो कधीही मी सोडू शकणार नाही. पण, काही लोक म्हणत होते, कुणी गटार, कुणी नाल्यातील घाण, कुणी तिकडे माँ कामाख्या देवीला बळी देणार, आता माँ कामाख्या देवीनं कुणाचा बळी घेतला? चाळीस रेडे पाठवले. पण माँ कामाख्या बोलली की जो बोललाय तो रेडा नको आम्हाला. सहन करायचीही एक परिसीमा असते. पण सहन करायचीही एक मर्यादा असते, पण काही तोंडातून काढलं नाही. आम्ही बुक्क्याचा मार खाऊन गप्प बसलो. रडत होतो आम्ही, काय किती बदनाम केलं जातंय? आम्ही गद्दार नाही, आमच्या रक्तात गद्दारी नाही, आम्ही उठाव केला, अशा शब्दात एकनाथ शिंदे यांनी संजय राऊत यांच्यावर जोरदार पलटवार केला होता.

Sanjay Raut Latest Tweet
शंभूराज देसाईंचं कॅबिनेट मंत्रिपद फिक्स; शिवेंद्रराजे, गोरेंनाही मंत्रिपदाची लॉटरी?

संजय राऊतांविरोधात जामीनपात्र वॉरंट जारी

भाजपचे नेते किरीट सोमय्या यांच्या पत्नी मेधा सोमय्या यांनी दाखल केलेल्या मानहानीच्या तक्रारीच्या सुनावणीसंदर्भात हजर राहण्याचा आदेश देऊनही शिवसेनेचे खासदार संजय राऊत हे सोमवारी गैरहजर राहिल्याने शिवडी महानगर न्यायदंडाधिकारी न्यायालयाने त्यांच्याविरोधात जामीनपात्र वॉरंट काढले. त्यामुळे आता 18 जुलै रोजी होणाऱ्या पुढील सुनावणीला हजर राहून राऊत यांना जामीन घ्यावा लागणार आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.