MLA disqualification Case: शिवसेनेची कागदपत्रे पूर्ण, अजित पवार गटाने मागितली पुन्हा वेळ! आमदार अपात्र प्रकरणात सुनावणीत काय घडलं?

Shiv Sena NCP MLA Disqualification: या प्रकरणाची सुनावणी आता सप्टेंबर महिन्याच्या सुरुवातीला होण्याची शक्यता आहे. त्यामुळे दोन्ही पक्षांचे लक्ष आता पुढील सुनावणीवर आहे.
Shiv Sena NCP MLA Disqualification case
Shiv Sena NCP MLA Disqualification caseesakal
Updated on

नवी दिल्ली: शिवसेनेची सर्व कागदपत्रे पूर्ण असूनही राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वकिलांनी काही अतिरिक्त वेळ मागितला आहे. आज सर्वोच्च न्यायालयात शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस आमदार अपात्रता प्रकरणावर सुनावणी होणार होती. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीने सिनियर वकील कौल यांनी कोर्टासमोर आपल्या पक्षाला उत्तर दाखल करण्यासाठी अधिक वेळ देण्याची विनंती केली. या विनंतीनुसार, काउंटर उत्तर दाखल करण्याची वेळ २ आठवड्यांसाठी वाढवण्यात आली आहे.

न्यायालयाचा आदेश

मुख्य न्यायाधीशांनी (CJI) सांगितले की, "आम्ही तुम्हाला पुढील गुरुवारपर्यंत वेळ देत आहोत. पुढील गुरुवारपर्यंत तुम्ही कागदपत्र सादर करा." अजित पवार यांच्या पक्षाला ही मुदत देण्यात आली आहे.

सुनावणी पुढे ढकलली

शिवसेनेची सर्व कागदपत्रे पूर्ण असूनही राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे कागदपत्र पूर्ण नसल्याने कोर्टाने सुनावणी पुढे ढकलली आहे. या महिन्यात दोन्ही प्रकरणांची सुनावणी होण्याची शक्यता कमी आहे.

Shiv Sena NCP MLA Disqualification case
Navneet Rana: प्रामाणिकपणे काम केलं पण... नवनीत राणा भाषण करताना ढसाढसा रडल्या, नेमकं काय घडलं?

अजित पवार गटाला अधिक वेळ

सकाळी अजित पवारांच्या वतीने त्यांच्या प्रकरणाचा उल्लेख कोर्टासमोर करण्यात आला. अजित पवार गटाने तीन आठवड्यांचा वेळ त्यांचे उत्तर सादर करण्यासाठी वाढवून मागितला होता. सर्वोच्च न्यायालयाने त्यांना तीन आठवड्यांचा वेळ दिला आहे. गेल्या सुनावणीत अजित पवार आणि त्यांच्या सोबतच्या आमदारांनी त्यांचे म्हणणे सादर करावे असे आदेश दिले होते.

पुढील सुनावणी-

या प्रकरणाची सुनावणी आता सप्टेंबर महिन्याच्या सुरुवातीला होण्याची शक्यता आहे. त्यामुळे दोन्ही पक्षांचे लक्ष आता पुढील सुनावणीवर आहे.

Shiv Sena NCP MLA Disqualification case
Amol Mitkari: गाडी फोडली तरी मिटकरींची माघार नाही, 'सुपारीबहाद्दर' म्हणत पुन्हा डिवचलं, मनसैनिकांच्या भूमिकेकडे लक्ष!

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.