Shivsena Politics : एकनाथ शिंदे सुद्धा 'मातोश्री'वर माफी मागायला आल्यास..; राऊतांनी मुख्यमंत्र्यांबाबत केलं मोठं विधान

'शरद पवार यांच्याबाबत कोणीही गैरसमज करू नये'
Vinayak Raut vs Eknath Shinde
Vinayak Raut vs Eknath Shindeesakal
Updated on
Summary

सिंधुदुर्ग जिल्ह्याचा ध्वजवंदनाचा मान कोल्हापूरचे पालकमंत्री असलेले दीपक केसरकर यांना देणे, हे दुर्दैवच म्हणावे लागेल.

सावंतवाडी : सरकारमध्ये उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांच्या आक्रमणानंतर शिंदे गटाची अधोगती सुरू आहे. शिंदे गटाचे पंधराहून अधिक आमदार आमच्या संपर्कात आहेत, असे भाकित विनायक राऊत यांनी केले.

भविष्यात एकनाथ शिंदे (Eknath Shinde) सुद्धा ''मातोश्री''वर माफी मागायला आल्यास आश्चर्य नाही; परंतु ''मातोश्री''वर गद्दारांना माफी नाही, हे ठरलेले आहे. गळाभेट इतर करतात; परंतु उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) करणार नाही, असंही खासदार विनायक राऊत (Vinayak Raut) यांनी येथे स्पष्ट केले.

Vinayak Raut vs Eknath Shinde
PN Patil : शरद पवारांना अडचणीत आणणाऱ्या महाडिकांना तेंव्हाच धोक्याची घंटा दिली होती; काँग्रेस नेत्याचा गौप्यस्फोट

आगामी लोकसभा निवडणुकीत रत्नागिरी, सिंधुदुर्गचा खासदार महाविकास आघाडीचाच असणार आहे. त्यामुळे दीपक केसरकर यांना खासदारकी लढविण्याची इच्छा असल्यास त्यांनी आपल्या पराभवाचा आकडा किती असेल, ते आत्ताच निश्चित करून ठेवावे, असा टोलाही त्यांनी यावेळी लगावला.

पत्रकार परिषदेत राऊत म्हणाले, ‘‘अजित पवार आणि राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांची भेट लपून राहिली नाही. त्यांना भेटायचे होते तर त्यांनी उघड-उघड भेटणे गरजेचे होते; मात्र, त्यांची भेट झाली तरी शरद पवार महाविकास आघाडीसोबतच आहेत. याशिवाय ते ''इंडिया''मध्येही भक्कमरित्या आहेत. येणाऱ्या काही दिवसातच ''इंडिया''ची तिसरी बैठक मुंबईमध्ये होणार आहे.

Vinayak Raut vs Eknath Shinde
25 आमदार राजीनामा देणार अन् लोकसभा निवडणुकीपूर्वीच काँग्रेस सरकार कोसळणार; भाजपच्या बड्या नेत्याच्या दाव्याने खळबळ

त्यामुळे शरद पवार यांच्याबाबत कोणीही गैरसमज करू नये. दुसरीकडे भाजपबरोबर अजित पवार आल्याने सरकारमधील त्यांच्या आक्रमणानंतर शिंदे गटाची अधोगती सुरू झाली आहे. त्यांचे तब्बल १५ हून अधिक आमदार आज ठाकरे शिवसेनेच्या संपर्कात आहेत. या संदर्भात पक्षप्रमुख जो निर्णय घेतील तो सर्वांना मान्य असेल.’’

ते म्हणाले, ‘‘नारायण राणे यांचे लोकसभेतील भाषण ऐकून लाज वाटली. सिंधुदुर्गाला बॅ. नाथ पै, प्रा. मधू दंडवते, सुरेश प्रभू यांच्यासारख्या विद्वान संसदपटूंचा वारसा लाभला आणि आम्ही त्यांचाच आदर्श घेऊन चाललो; मात्र नारायण राणे केंद्रीय मंत्री असूनही त्यांनी संसदेमध्ये आपले वैचारिक दारिद्र्य दाखवून दिले. ते एक प्रकारे कोकणला लागलेले दूषणच म्हणावेच लागेल.

Vinayak Raut vs Eknath Shinde
Kolhapur : भाजपला टक्कर देण्यासाठी काँग्रेसला मोठी संधी; 'या' दोन बड्या नेत्यांनी एकजूट दाखवली तर बदलणार संपूर्ण चित्र

सिंधुदुर्ग जिल्ह्याचा ध्वजवंदनाचा मान कोल्हापूरचे पालकमंत्री असलेले दीपक केसरकर यांना देणे, हे दुर्दैवच म्हणावे लागेल. मणिपूर येथे दोन गटांत सुरू असलेला वाद व तेथील एकूणच परिस्थिती पाहता आता पंतप्रधानांनी गांभीर्याने पाहणे गरजेचे आहे. मणिपूरमध्ये तत्काळ राष्ट्रपती राजवट लागू करावी.’’ यावेळी त्यांच्यासोबत बाळा गावडे, मंदार शिरसाट, जान्हवी सावंत आदी होते.

Vinayak Raut vs Eknath Shinde
Loksabha Election : माढ्याचा पुढील खासदार काँग्रेस पक्षाचाच असेल; माजी मुख्यमंत्र्यांचं थेट भाजपलाच चॅलेंज

अन्यथा स्वस्थ बसू देणार नाही!

दोडामार्ग तालुक्यातील हत्तींचा प्रश्न लक्षात घेता वन विभागाने ऑक्टोबरपासून हत्ती प्रतिबंध कारवाई हाती घ्यावी. तसे न झाल्यास आम्ही प्रशासनाला स्वस्थ बसू देणार नाही. या संदर्भात मी, उपवनसंरक्षक नवकिशोर रेड्डी यांच्याशी चर्चा केली आहे. हत्तींचा कायमस्वरुपी बंदोबस्त करायचा असेल, तर कर्नाटकशिवाय पर्याय नाही. कर्नाटक शासनासोबत चर्चा करून त्यांचे मार्गदर्शन घ्या व उपाययोजना आखा, अशा सूचना दिल्याची माहिती खासदार राऊत यांनी दिली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.