"अयोध्येस चोरांची आळंदी करणाऱयांना श्रीराम माफ करणार नाहीत!"

Ayodhya : जमीन घोटाळा प्रकरणावरून शिवसेनेची भाजपवर तिखट शब्दात टीका.
PM Modi - Sanjay Raut
PM Modi - Sanjay RautTeam eSakal
Updated on

अयोध्येत (Ayodhya) भाजप (BJP) नेते आणि सरकारी अधिकाऱ्यांच्या नातेवाईकांनी राम मंदिराभोवतीची जमीन बळकावल्याप्रकरणी काँग्रेसने पंतप्रधान नरेंद्र मोदींना (PM Narendra Modi) जाब विचारला आहे. अयोध्येतील जमीन बळकावल्याच्या बातम्या समोर आल्यानंतर पुन्हा एकदा गंभीर प्रश्न उपस्थित होत आहेत. या प्रकरणाची सखोल चौकशी झाली पाहिजे, अशी मागणी देखील काँग्रेसने केली आहे. या प्रकरणाबाबत काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी बुधवारी 'हिंदु धर्माच्या नावाखाली लुटले' अशा आशयाचं ट्विट केलं होतं. त्यानंतर आता शिवसेनेचं (Shiv Sena) मुखपत्र 'सामना'तून (Saamana) देखील भाजपवर खरमरीत टीका करण्यात आली आहे.

PM Modi - Sanjay Raut
ओमिक्रॉनच्या पार्श्वभूमीवर PM मोदींनी बोलावली उच्चस्तरीय बैठक

अयोध्येतील जमीन घोटाळा प्रकरण समोर आल्यानंतर आता शिवसेनेनं भाजपवर हल्लाबोल केला आहे. भाजपच्या हिंदुत्वात श्रीराम नाही तर फक्त व्यवहार आहे असा आरोप सेनेनं केला आहे. आजू बाजूच्या जमिनी लाटण्यासाठीच भाजपला मंदिर हवं आहे. तसंच त्यांचं हा घोटाळा उघडकीस येणं देखील श्री रामांची कृपा असल्याचं भाजपने म्हटलं आहे. तसंच इतरांसाठी राम नाम सत्य है, मात्र भाजपसाठी फक्त पैसा जमिनच सत्य आहे अशी तिखट टीका सामनातून करण्यात आली आहे.

PM Modi - Sanjay Raut
अधिवेशन मुदतीआधी गुंडाळले; लोकसभा व राज्यसभेतील कामकाजाचा टक्का घसरला

सामनामध्ये काय म्हटलंय?

भारतीय जनता पक्षाचे हिंदुत्व म्हणजे एकप्रकारचा ‘चोरबाजार’ आहे हे वारंवार उघड होत आहे. त्या चोरबाजारात आता अयोध्येचा जमीन व्यवहारही सामील झाला आहे. अयोध्या निकालानंतर राममंदिर परिसरात भाजप पुढारी, भाजपचे आमदार, महापौर, भाजप गटातील नोकरशाही मंडळींनी वैध-अवैध मार्गाने जमिनी खरेदी केल्या. हे व्यवहार संशयास्पद, तितकेच धक्कादायक आहेत. सर्वोच्च न्यायालयाच्या निकालानंतर अयोध्येत भव्य राममंदिर उभारणीचा मार्ग मोकळा झाला. पंतप्रधान मोदी, सरसंघचालक भागवत, योगी आदित्यनाथ यांच्या उपस्थितीत मंदिराचा भूमिपूजन सोहळा पार पडला, पण त्याच दरम्यान भाजप परिवारातील व्यापाऱ्यांनी मंदिर परिसरातील मोक्याच्या जमिनींचे व्यवहार सुरू केले. मंदिरासाठी राम जन्मभूमी ट्रस्टने 70 एकर जमिनीचे अधिग्रहण केले, पण त्याच वेळी भाजपसंबंधित आमदार, नगरसेवक, पोलीस अधिकाऱयांनी जमिनी विकत घेऊन मोठय़ा प्रमाणात गुंतवणूक केली. आमदार, महापौर, राज्य ओबीसी आयोगाचे सदस्य, विभागीय आयुक्त, पोलीस उपमहानिरीक्षक, राज्य माहिती आयुक्त, त्यांच्या नातेवाईकांनी न्यायालयाच्या निकालानंतर राममंदिराच्या चार-पाच किलोमीटरच्या परिसरात कोटय़वधींचा जमीन व्यवहार केल्याचे वृत्त सरकारी नोंदीसह ‘इंडियन एक्सप्रेस’ने दिले. मंदिर उभारणीनंतर या संपूर्ण परिसराचा कायापालट होईल व आज घेतलेल्या जमिनीचे भाव शतपटीने वाढतील असा हा धर्माच्या नावावर चाललेला व्यापार आहे. राममंदिरासाठी लढले कोण? रक्त सांडले कोणी? मेले कोण व मंदिराच्या नावावर मलिदा खाणारे कोण? हे गौडबंगालच आहे. व्यवहार कसा झाला तो पहा. अयोध्येच्या महापौरांनी एक जमीन खरेदी केली. त्या जमिनीचा व्यवहार लाखांत झाला व तीच जमीन त्यांनी पुढच्या पाच-दहा मिनिटांत रामजन्मभूमी ट्रस्टला 16 कोटींना विकल्याचे प्रकरण समोर आले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.