Jagannath Abhyankar Wins: मुंबई शिक्षक मतदारसंघात ठाकरे सेनेचे जगन्नाथ अभ्यंकर विजयी

त्यांना पहिल्या क्रमांकाच्या पसंतीची 4 हजार 83 मते पडली.
Jagannath Abhyankar
Jagannath Abhyankar

नवी मुंबई : विधान परिषदेच्या मुंबई शिक्षक मतदार संघाच्या व्दिवार्षिक निवडणुकीत आज ठाकरेंच्या शिवसेनेचे उमेदवार जगन्नाथ मोतीराम अभ्यंकर हे विजयी झाले आहेत. त्यांना पहिल्या क्रमांकाच्या पसंतीची 4 हजार 83 मते पडली. (Shiv Sena Uddhav Balasaheb Thackeray Candidate Jagannath Abhyankar wins in Mumbai Teachers Constituency)

Jagannath Abhyankar
Maratha Reservation: मराठा आरक्षणविरोधी याचिकांवर हायकोर्टानं व्यक्त केली चिंता; नोंदवलं महत्वाचं निरिक्षण

बाराव्या फेरीअखेर ठाकरेंच्या शिवसेनेचे उमेदवार जगन्नाथ अभ्यंकर हे सर्वाधिक पसंतीक्रमाची 4 हजार 83 मते मिळवून मुंबई शिक्षक मतदार संघातून निवडून आले, निवडणूक निर्णय अधिकारी तथा विभागीय आयुक्त पी. वेलरासू यांनी हा निकाल जाहीर केला.

Jagannath Abhyankar
UPSC Prelims Exam Result : युपीएससीच्या पूर्व परीक्षेचा निकाल जाहीर; असा पाहा निकाल

यासाठी आज नेरुळ येथील आगरी कोळी संस्कृती भवन इथं मतमोजणी शांततेत पार पडली. मतमोजणीसाठी एकूण 14 टेबल ठेवण्यात आले होते. या निवडणुकीत एकूण 12 हजार मतदारांनी मतदान केलं होतं. त्यांपैकी 11 हजार 598 मतं वैध ठरली तर 402 मतं अवैध ठरली. जिंकून येण्यासाठी 5 हजार 800 इतक्या मतांचा निश्चित कोटा ठेवण्यात आला होता.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com