मोठी बातमी! निवडणूक आयोगाच्या निर्णयानंतर शिंदे गट पुन्हा सुप्रीम कोर्टात; आता दाखल...

Uddhav Thackeray and Eknath Shinde
Uddhav Thackeray and Eknath ShindeSakal
Updated on

नवी दिल्ली : केंद्रीय निवडणूक आयोगाच्या निर्णयानंतर एकनाथ शिंदे गटाने सर्वोच्च न्यायालयात कॅव्हेट दाखल केले आहे. निवडणूक आयोगाच्या निर्णयाला उद्धव गटाने आव्हान दिल्यास न्यायालयाने एकतर्फी सुनावणी घेऊन कोणताही आदेश देऊ नये, त्यांची बाजूही ऐकून घ्यावी, असे आवाहन कॅव्हेटद्वारे न्यायालयाला करण्यात आले आहे.

Uddhav Thackeray and Eknath Shinde
Eknath Shinde : पक्षाचं नेतृत्व करणारा किती मजबूत हेच लोक बघतात; अजित पवारांचं सूचक विधान

तत्पूर्वी, शिवसेनेचे उद्धव ठाकरे गटाचे नेते संजय राऊत यांनी शनिवारी उद्धव ठाकरे यांची भेट घेतल्यानंतर माध्यमांशी संवाद साधला. निवडणूक आयोगाच्या निर्णयाला न्यायालयात आव्हान देणार असल्याचं त्यांनी सांगितले. महासत्तेच्या मदतीने आमचा पक्ष चोरीला गेला आहे, हे आम्ही लोकांना सांगू, असे ते म्हणाले.

संजय राऊत म्हणाले की, एक काळ होता जेव्हा मंदिरातून मूर्ती चोरीला जायच्या, आता लोक बाप चोरत आहेत. आज उद्धव यांनी कारवर उभा राहून भाषण केले, तेव्हा लोकांना बाळासाहेबांची आठवण आली. शिवसेना बदला घेऊन पुन्हा सत्तेत येईल, असे ते म्हणाले.

Uddhav Thackeray and Eknath Shinde
Uddhav Thackeray : सगळं चोरलं पण ठाकरी बाणा अन् बाप कुठून चोरणार? पुण्यात झळकले बॅनर

तत्पूर्वी, उद्धव ठाकरे यांनी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर निशाणा साधत पक्षाचे निवडणूक चिन्ह ‘चोरी’ झाली असून ‘चोरा’ला धडा शिकवण्याची गरज असल्याचे म्हटले आहे. उद्धव ठाकरे यांनी मोठ्या जनसमुदायाला संबोधित केले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.