शक्ती कायदा : महिला कायद्याचा गैरवापर करतात?, नीलम गोऱ्हेंचं सडेतोड उत्तर

महिला बलात्काराची तक्रार करते, तो गैरवापर आहे असा पुरुषांचा समज आहे. स्वेच्छेने एकत्र राहणाऱ्या व्यक्तीने नंतर तक्रार करू नये हे असे गृहीत आहे.
Neelam Gorhe
Neelam GorheNeelam Gorhe Facebook Page
Updated on

महिला बलात्काराची तक्रार करते, तो गैरवापर आहे असा पुरुषांचा समज आहे. स्वेच्छेने एकत्र राहणाऱ्या व्यक्तीने नंतर तक्रार करू नये हे असे गृहीत आहे. त्याच पद्धतीने जवळीक असताना त्या महिलेसंदर्भातील माहिती, त्याचे व्यापारीकरण आणि ब्लॅकमेलिंग करणे हेदेखील तेवढेच गैर आहे, असे मत विधान परिषदेच्या उपसभापती नीलम गोऱ्हे (neelam gorhe) यांनी व्यक्त केले.

मुंबईत झालेल्या विधिमंडळाच्या हिवाळी अधिवेशनात (winter session) शक्ती कायदा (shakti law) पारित झाला. महिला अत्याचाराविरोधातील कठोर कायदा म्हणून शक्ती कायद्याचा उल्लेख केला जातोय. हा कायदा पारित होण्याच्या प्रक्रियेत विधान परिषदेच्या उपसभापती नीलम गोऱ्हे यांनी महत्त्वाची भूमिका बजावली होती. या पार्श्वभूमीवर नीलम गोऱ्हे यांनी ‘सकाळ’शी बातचीत केली. (Neelam Gorhe Podcast)

महिलांकडून शक्ती कायद्याचा गैरवापर केला जाईल, अशी भीती वारंवार व्यक्त केली जातेय. यावर नीलम गोऱ्हेंनी सडेतोड प्रत्युत्तर दिले. नीलम गोऱ्हे म्हणतात, एखाद्या कुटुंबात पती-पत्नीचे पटत नाही, ती वेगळी झाली आणि नवऱ्याने तिच्याशी संबंध ठेवण्याचा प्रयत्न केला तरी कोर्टाच्या निकालानुसार बलात्कार ठरतो. विवाहाअंतर्गत झालेल्या वाद-विवादानंतर अशा प्रकारच्या तक्रारी समाजाच्या पचनी पडत नाहीत. वादावादी झाल्यानंतर कुणीही दुसऱ्या व्यक्तीसोबत जबरदस्ती करू शकत नाही हे न्यायाचे साधे तत्त्व आहे. (Neelam Gorhe Latest News)

नीलम गोऱ्हे यांची सविस्तर मुलाखत ऐका सकाळ पॉडकास्टमध्ये (Neelam Gorhe Podcast)

सध्या लिव्ह इन रिलेशनशिप हा बर्निंग इश्यू आहे. लिव्ह इनमध्ये काही दिवसांनंतर जमेनासे होते. त्यानंतर महिला बलात्काराची तक्रार करते, तो गैरवापर आहे असा पुरुषांचा समज आहे; मात्र स्वेच्छेने एकत्र राहणाऱ्या व्यक्तीने नंतर तक्रार करू नये हे असे गृहीत आहे. त्याच पद्धतीने जवळीक असताना त्या महिलेसंदर्भातील माहिती, त्याचे व्यापारीकरण आणि ब्लॅकमेलिंग करणे हेदेखील तेवढेच गैर आहे. उत्तराला प्रत्युत्तर दिले की मग एकतर्फी हाकाटी होते. अनेक वेळा महिलेचे म्हणणे व्यवस्थित नोंदवले न गेल्यानेही या घटना होतात; मात्र आता कोर्टात सिद्ध होईल की तक्रार खोटी आहे. त्यानंतर शिक्षा होईल, असं त्यांनी सांगितले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.