Shivaji Maharaj Statue : बांधकाम सल्लागार डॉ. चेतन पाटीलला 5 सप्टेंबरपर्यंत पोलीस कोठडी; शिल्पकार आपटे अद्यापही फरार

Construction consultant Dr. Chetan Patil : पुतळा उभारताना पर्यावरणाचा अभ्यास केला होता का? यासह अन्य बाबींचा तपास करायचा आहे.
Construction consultant Dr. Chetan Patil
Construction consultant Dr. Chetan Patilesakal
Updated on
Summary

दोन्ही बाजू ऐकल्यानंतर न्यायाधीश एम. आर. देवकाते यांनी संशयित आरोपी डॉ. चेतन पाटील याला 5 सप्टेंबर पर्यंत पोलीस कोठडी सुनावली.

मालवण : राजकोट येथील छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा कोसळल्याप्रकरणी (Chhatrapati Shivaji Maharaj Collapse Statue) गुन्हा दाखल असलेल्या बांधकाम सल्लागार डॉ. चेतन पाटील (Dr. Chetan Patil) याला आज दुपारी येथील न्यायालयात (Malvan Court) हजर करण्यात आले. सरकारी पक्षाचा व आरोपींच्या वकिलांचा युक्तिवाद ऐकल्यानंतर न्यायाधीश एम. आर. देवकाते यांनी संशयित आरोपी डॉ. पाटील याला 5 सप्टेंबरपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे, अशी माहिती सरकारी अभियोक्ता ॲड. तुषार भणगे यांनी दिली.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.