Shivaji Maharaj Statue: पालकमंत्र्यांनी राजीनामा द्यावा, ठाकरे गटाचे आमदार वैभव नाईक यांची मागणी!

Shivaji Maharaj Statue: पालकमंत्र्यांनी राजीनामा द्यावा, ठाकरे गटाचे आमदार वैभव नाईक यांची मागणी!
Updated on

तसेच कोट्यवधी खर्चूनही शिवरायांचा पुतळा पंचधातूचा केलेला नाही. अत्‍यंत कमी दर्जाचे साहित्‍य वापरून पुतळ्याची उभारणी करण्यात आली. त्‍यामुळे आठ महिन्यांतच पुतळा कोसळण्याची नामुष्की ओढवली आहे.’’

श्री.नाईक म्‍हणाले, ‘‘राजकोट येथील पुतळ्याचे नटबोल्‍ट गंजल्‍याबाबतचे पत्र बांधकाम विभागाने जिल्‍हाधिकाऱ्यांना २३ ऑगस्टला पाठवले. याचाच अर्थ बांधकाम विभागाला पुतळ्याच्या दूरवस्थेबाबत माहिती होती. परंतु, तातडीने कोणतीही कार्यवाही केली नाही.

त्यामुळे घटनेला सार्वजनिक बांधकाम विभागही तेवढाच जबाबदार आहे. बांधकाम खात्‍याचे मंत्री रवींद्र चव्हाण यांनी आपल्‍या कार्यकर्त्यांना पुतळा उभारणीची कंत्राटे दिली. त्‍यामुळे पुतळा कोसळण्याच्या घटनेत तेही तेवढेच दोषी आहेत. श्री.चव्हाण हे राजीनामा देईपर्यंत आम्ही आंदोलन सुरूच ठेवू.

Shivaji Maharaj Statue: पालकमंत्र्यांनी राजीनामा द्यावा, ठाकरे गटाचे आमदार वैभव नाईक यांची मागणी!
Shivaji Maharaj Statue : CM शिंदे, उपमुख्यमंत्री फडणवीस यांनी राजीनामा द्या, पृथ्वीराज चव्हाण यांनी का केली मोठी मागणी ?

जयंत पाटील आज सिंधुदुर्गात

सावंतवाडीः राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील उद्या (ता. २८) सिंधुदुर्ग जिल्हा दौऱ्यावर येत आहेत. सकाळी ८.२० वाजता गोवा येथे त्यांचे आगमन व ९ वाजता सावंतवाडी विश्रामगृह येथे त्यांची पत्रकार परिषद होणार आहे. साडेदहा वाजता मालवण येथे आगमन होणार असून, महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज यांच्या स्मारकाची ते पाहणी करणार आहेत. त्यानंतर राजकोट येथील महाविकास आघाडीच्या निषेध आंदोलनास उपस्थित राहणार आहेत. याबाबतची माहिती शरदचंद्र पवार राष्ट्रवादी काँग्रेस कोकण विभाग महिला अध्यक्षा अर्चना घारे-परब यांनी दिली.

...म्‍हणून ‘बांधकाम’चे कार्यालय फोडले

तळा कोसळण्याच्या संपूर्ण घटनेला सार्वजनिक बांधकाम विभाग जबाबदार आहे. बांधकाम विभागामार्फतच संपूर्ण पुतळा उभारणीचे काम झाले होते. या दुर्घटनेला बांधकाम खातेच जबाबदार असल्‍याने आपण बांधकाम विभागाचे कार्यालय फोडले. याप्रकरणी माझ्यावर गुन्हे दाखल झाले आहेत. पण, मला त्‍याची पर्वा नाही असे श्री.नाईक म्‍हणाले.

Shivaji Maharaj Statue: पालकमंत्र्यांनी राजीनामा द्यावा, ठाकरे गटाचे आमदार वैभव नाईक यांची मागणी!
Nagpur Crime : सिलिंडरचा काळाबाजार करणाऱ्या रॅकेटचा भंडाफोड; ५९ सिलिंडर आणि गॅस रिफिलिंग मशीनसह इतर साहित्य जप्त

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.