मुंबई- शिवाजी महाराजांचा पुतळा जेव्हा उभारण्यात आला तेव्हा नेव्ही डे व्हायचा होता. त्यामुळे घाईघाईत निर्णय घेण्यात आले. आर्किटेकची अपॉईंटमेंट घेण्यात आली. आता आपल्याकडे पुरेसा वेळ आहे. कदाचीत महाराजांचीच इच्छा असावी की अरबी समुद्रात त्यांचा भव्य पुतळा उभारला जावा, असं वक्तव्य शिक्षणमंत्री दीपक केसरकर म्हणाले आहेत. ते 'एएनआय' या वृत्तसंस्थेशी बोलत होते.
चांगल्या दृष्टीने आपण याकडे पाहायला हवं. यामध्ये राजकारण यायला नको, असं देखील दीपक केसरकर म्हणाले आहेत. सिंधुदुर्ग जिल्ह्यातील राजकोट किल्ल्यावर असलेला छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा सोमवारी कोसळला आहे. यावरून मराठी माणसामध्ये संतापाची लाट आहे. महाराजांचा हा ३५ फूट उंचीचा पुतळा आठ महिन्यामध्येच पडला असल्यामुळे आश्चर्य व्यक्त केले जात आहे. यावरून राजकारण तापलं आहे.