अमरावती (आंध्रप्रदेश) : आंध्रप्रदेशमधील तिरूमला तिरूपती मंदीर प्रशासनाने गाडीत शिवाजी महाराजांची मुर्ती असल्याने प्रवेश नाकारल्याचा दावा एका भाविकाने केला होता. त्यानंतर बालाजी मंदीर प्रशासनाने यावर स्पष्टीकरण दिलं असून हा आरोप खोटा असल्याचं प्रशासनाने सांगितलं आहे. विशेष म्हणजे शिवसेनेचे नेते मिलिंद नार्वेकर हे या मंदिराचे विश्वस्त आहेत.
दरम्यान, काल तिरूपती देवस्थानच्या चेक पोस्टवरील एक व्हिडिओ व्हायरल झाला होता. त्यामध्ये एका व्यक्तीने मंदीर प्रशासनावर आरोप करत गाडीत छत्रपती शिवाजी महाराजांची मुर्ती असल्यामुळे आम्हाला प्रवेश नाकारण्यात आला आहे. गाडीतील शिवाजी महाराजांची मुर्ती काढून टाका अन्यथा पुढे जाऊ दिले जाणार नाही असं कर्मचारी म्हणत असल्याचा दावा सदर व्यक्तीने केला होता. त्यानंतर आता मंदिर प्रशासनाने स्पष्टीकरण दिलं आहे.
ददरम्यान, या घटनेनंतर अनेकांकडून मंदिरावर आक्षेप घेतले जात असून देवस्थानाविरोधात रोष व्यक्त केला जात होता. तुम्ही शिवाजी महाराजांच्या मुर्त्यांवर बंदी घातली तर आम्ही महाराष्ट्रीतल लोकं तिथे येणार नाहीत अशा शब्दांत रोष व्यक्त केला जात आहे.
यानंतर, व्हायरल होत असलेला व्हिडिओ खोटा असून गाडीमध्ये मुर्ती, फोटो, राजकीय निशाणी असलेल्या वाहनांवर एका दशकांपूर्वी मंदीर प्रशासनाने बंदी घातली असल्याचं स्पष्टीकरण बालाजी देवस्थानने दिले आहे. दरम्यान, दोन दिवसांपूर्वी कर्मचाऱ्यांनी एक गाडी अडवली होती पण अडवलेल्या गाडीतील मुर्ती शिवाजी महाराजांची असल्याचं समजताच त्यांना प्रवेश देण्यात आला आहे. देवतांच्या चित्रांशिवाय कुठलाच फोटो ठेवण्याच मनाई देवस्थानने केली आहे पण सदर भाविकाने केलेले आरोप खोटे असल्याचं स्पष्टीकरण बालाजी देवस्थानने केला आहे.
दरम्यान, हा व्हिडिओमधून आणि मजकूरांतून इतरांना भडकवण्याचा प्रयत्न होत असून असे खोटे आरोप करणे अयोग्य आहे. या व्हिडिओतील मजकूराचा देवस्थान तीव्र शब्दांत निषेध करत आहे. असं सांगत देवस्थानने हा आरोप फेटाळून लावला आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.