Shivajirao Adhalrao: आढळराव अजितदादांसोबत जाणार?; कोल्हेंना शह देण्यासाठी हालचालींना वेग

अजित पवारांनी नुकतेच अमोल कोल्हेंविरोधात उमेदवार देणार असल्याचं म्हटलं होतं.
Adhalrao_Ajit Pawar_Amol Kolhe
Adhalrao_Ajit Pawar_Amol Kolhe
Updated on

मुंबई : राज्यात आता लोकसभा निवडणुकीच्या चर्चा सुरु व्हायला लागल्या आहेत. शिरुर लोकसभा मतदारसंघातून शरद पवार गटाचे खासदार अमोल कोल्हेंविरोधात उमेदवार देणार असल्याचं नुकतेच अजित पवारांनी सांगितलं.

यावर कोल्हे-पवार यांच्या क्रिया-प्रतिक्रिया सुरु असतानाच आता शिरुरचे माजी खासदार आणि शिवसेनेच्या शिंदे गटाचे नेते शिवाजीराव अढळराव पाटील हे अजित पवारांच्या गटात प्रवेश करणार असल्याची चर्चा आहे. टीव्ही ९ मराठी वृत्तवाहिनीनं यासंदर्भात वृत्त दिलं आहे. (Shivajirao Adhalrao may go with NCP Ajit Pawar group for counter to Amol Kolhe in Shirun LS Constituency)

Adhalrao_Ajit Pawar_Amol Kolhe
Manoj Jarange: मागासवर्ग आयोगाच्या निकष बदलांच्या चर्चांवर जरांगेंनी प्रतिक्रिया; म्हणाले, यासाठीच...

अजितदादा कोल्हेंविरोधात देणार उमेदवार

माध्यमांतील चर्चांनुसार, अजित पवारांनी शिरुर मतदारसंघात अमोल कोल्हेंविरोधात उमेदवार देणार असल्याची घोषणा केल्यानंतर अजितदादांचा उमेदवार कोण असेल? अशी चर्चा सुरु झाली होती. या चर्चेच्या पार्श्वभूमीवर आता आढळराव पाटीलच ते उमेदवार असतील असं सांगितलं जात आहे. (Latest Marathi News)

Adhalrao_Ajit Pawar_Amol Kolhe
Ajit Pawar: "तीन-चार महिन्यांत अजित पवार जेलमध्ये दिसतील"; शालिनीताई पाटलांचा घणाघात, हायकोर्टात दाखल करणार याचिका

पाच वर्षात राजकीय उलथापालथ

दरम्यान, गेल्या पाच वर्षात राज्याच्या राजकारणात बरीच उलथापालथ झाली आहे. त्यामुळं गेल्यावेळची सगळी राजकीय समिकरणंच बदलुन गेली आहेत. कारण सन २०१९ च्या लोकसभा निवडणुकीवेळी महाविकास आघाडी अस्तित्वात नव्हती. (Marathi Tajya Batmya)

त्यामुळं शिरुर लोकसभा मतदारसंघात तत्कालीन शिवसेनेचे खासदार शिवाजीराव आढळराव पाटील यांना सेनेनं पुन्हा उमेदवारी दिली होती. तर आढळराव यांच्या विरोधात राष्ट्रवादी काँग्रेसनं अमोल कोल्हे यांना रिंगणात उतरवलं होतं. या निवडणुकीत कोल्हेंचा विजय झाला होता.

Adhalrao_Ajit Pawar_Amol Kolhe
'Dunki’ Flight: 'डंकी'चा संशय! फ्रान्समध्ये थांबवलेलं विमान 276 प्रवाशांसह मुंबईत लँड; इतर 24 जणांचं काय?

शिवसेना-राष्ट्रवादीच्या फुटीनंतर राजकारण बदललं

पण त्यानंतर डिसेंबर २०१९ मध्ये शिवसेना-राष्ट्रवादी-काँग्रेस एकत्र येत महाविकास आघाडीचं सरकार स्थापन झालं होतं. त्यामुळं आपल्याला निवडणुकीत पाडणाऱ्यांसोबत सत्ता स्थापन केल्यानं आढळराव पाटील उद्धव ठाकरेंवर नाराज होते. (Latest Maharashtra News)

पण पुढे एकनाथ शिंदेंमुळं शिवसेनेत फूट पडल्यानं आढळरावांनीही उद्धव ठाकरेंची साथ सोडत शिंदेंसोबत गेले. दरम्यान, राष्ट्रवादीतही अजित पवारांमुळं फूट पडली त्यामुळं आता शरद पवारांसोबत असलेल्या अमोल कोल्हेंविरोधात अजित पवारांनी दंड थोपटले आहेत.

Adhalrao_Ajit Pawar_Amol Kolhe
Video : जंगलच्या राजाचा रुबाब भारी! गावात भिंतीवर 'सनबाथ' घेणाऱ्या वाघाला पाहण्यासाठी तुफान गर्दी

शिरुरमधून पुन्हा आढळराव इच्छुक

या राजकीय परिस्थिचा फायदा घेण्यासाठी आता आढळराव पाटील शिंदे गटातून अजित पवार गटात येण्यासाठी इच्छुक आहेत. कारण अजित पवार जर शिरुर मतदारसंघात कोल्हेंविरोधात उमेदवार शोधत असतील तर तो उमेदवार आपण होऊ शकतो अशी आशा आढळराव पाटलांना असावी. त्यामुळं आता पुन्हा शिरुर मतदारसंघात आढळराव विरुद्ध कोल्हे असा एकाच पक्षातील दोन गटांचा सामना पाहायला मिळू शकतो.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.