पुणे - महाराष्ट्रात आता आणखी एका पुस्तकावरून वाद निर्माण होण्याची शक्यता आहे. 'शिवरायांच्या स्वराज्याच्या अंत पेशवा ब्राह्मणांनी केला', या पुस्तकाचं प्रकाशन होणार आहे. १२ जानेवारी रोजी जिजाऊ जयंतीचं औचित्य साधून हे पुस्तक प्रकाशित होणार आहे. मात्र या पुस्तकावर बंदी घालण्याची मागणी करण्यात आली आहे. (Chhatrapati Shivaji Maharaj news in Marathi)
विलास खरात यांनी लिहिलेलं 'शिवरायांच्या स्वराज्याच्या अंत पेशवा ब्राह्मणांनी केला' पुस्तक जातीय द्वेष निर्माण करणारं असल्याचा आरोप परशुराम सेवा संघाचे अध्यक्ष विश्वजीत देशपांडे यांनी केली आहे. ते म्हणाले की, पुणे पोलिस आयुक्तांकडे तक्रार दाखल केली आहे. या पुस्तकावर बंदी घालण्याची मागणी केली आहे.
दरम्यान या प्रकाशनावर बंदी घातली गेली पाहिजे. खोटा इतिहास पुस्तकाच्या माध्यमातून छापला जाणे चुकीचे आहे. पेशवे ब्राह्मण म्हणून हे केलं जात आहे. पेशवे हे कधीही ऱाजे झाले नाही. राजे हे भोसले घराणं आहे. छत्रपती शिवाजी महाराजांचं भोसले घराणं आमचं दैवत असल्याचंही देशपांडे यांनी म्हटलं आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.