उदयनराजे फडणवीसांना भेटताच शिवेंद्रराजेंचा मंत्रिमंडळातून पत्ता कट?

शिवेंद्रसिंहराजेंची अजित पवारांशी असलेली जवळीक अडचणीची ठरल्याची चर्चा आहे.
Udayanraje Bhosale vs Shivendraraje Bhosale
Udayanraje Bhosale vs Shivendraraje Bhosaleesakal
Updated on
Summary

राज्य मंत्रिमंडळाचा गेले 38 दिवस रखडलेला विस्तार आज सकाळी 11 ला राजभवनवर होणार आहे.

मुंबई : राज्य मंत्रिमंडळाचा गेले 38 दिवस रखडलेला विस्तार आज (मंगळवार) सकाळी 11 ला राजभवनवर होणार आहे. राजभवनच्या दरबार हॉलमध्ये राज्यपाल भगतसिंह कोश्यारी (Bhagat Singh Koshyari) हे नवीन मंत्र्यांना पद व गोपनीयतेची शपथ देतील. शपथविधी समारंभासाठी केंद्रीय मंत्री नितीन गडकरी, शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे, विधानसभेचे विरोधी पक्षनेते अजित पवार आदींना निमंत्रण देण्यात आलंय.

दरम्यान, मंत्रिमंडळात एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांच्या गटाच्या पहिल्या पाच मंत्र्यांत पाटणचे आमदार शंभूराज देसाई (Shambhuraj Desai) यांच्या नावाचा समावेश आहे. पण, भाजपची यादी जाहीर होण्यापूर्वी एकतासभर आधी खासदार उदयनराजेंनी (Udayanraje Bhosale) देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांची त्यांच्या 'सागर' या निवासस्थानी भेट घेतली होती. त्यानंतर जाहीर झालेल्या यादीत आमदार शिवेंद्रसिंहराजेंचं नाव नसल्याचं स्पष्ट झालं. त्यामुळं शिवेंद्रसिंहराजेंना (Shivendraraje Bhosale) मंत्रीपद मिळणार का, याची उत्सुकता आता ताणलीय.

Udayanraje Bhosale vs Shivendraraje Bhosale
America : माजी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या घरावर 'एफबीआय'चा छापा; जाणून घ्या कारण

सातारा, जावळीतील त्यांच्या कार्यकर्त्यांत अस्वस्थता पसरलीय. भाजपच्या पाहिल्या पाच ते सात मंत्र्यांच्या यादीत शिवेंद्रसिंहराजेंना स्थान मिळण्याची शक्यता होती. पण, त्यांचं नाव यादीत दिसत नसल्यानं अनेकांचा उत्साह मावळला होता. त्यांची राष्ट्रवादीचे नेते व माजी उपमुख्यमंत्री अजित पवारांशी असलेली जवळीक अडचणीची ठरल्याचीही चर्चा आहे.

Udayanraje Bhosale vs Shivendraraje Bhosale
BJP : तेलंगणात भाजप नेत्याची आत्महत्या; घरात लटकलेल्या अवस्थेत आढळला मृतदेह

भाजपतर्फे : प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील, माजी मंत्री सुधीर मुनगंटीवार, राधाकृष्ण विखे पाटील, गिरीश महाजन, माधुरी मिसाळ, संभाजी पाटील निलंगेकर, सुरेश खाडे, मंगल प्रभात लोढा, विजयकुमार गावित, रवींद्र चव्हाण.

मुख्यमंत्री शिंदे गटाकडून : उदय सामंत, दीपक केसरकर, दादा भुसे, संजय राठोड, संजय शिरसाट, तानाजी सावंत, संदिपान भुमरे, शंभूराज देसाई.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.