Shivsena MLA Disqualification : 10 व्या अनुसूचीमधील कलमांचा योग्य वापर करणार, नार्वेकरांनी निकालापूर्वी दिले स्पष्ट संकेत

शिवसेना आमदार अपात्रतेप्रकरणी बुधवारी निकाल येणार आहे. विधानसेभेचे अध्यक्ष राहुल नार्वेकर हे आमदारांच्या अपात्रेसंबंधी निकाल देतील.
Rahul Narvekar Latest Marathi News
Rahul Narvekar Latest Marathi News Esakal
Updated on

Rahul Narvekar on cm Eknath Shinde : शिवसेना आमदार अपात्रतेप्रकरणी बुधवारी निकाल येणार आहे. विधानसेभेचे अध्यक्ष राहुल नार्वेकर हे आमदारांच्या अपात्रेसंबंधी निकाल देतील. एकनाथ शिंदे यांच्यावरही अपात्रतेची टांगती तलवार असल्याने संपूर्ण देशाचं लक्ष या निकालाकडे लागलेलं आहे.

शिंदे गटाच्या १६ आणि ठाकरे गटाच्या १४ आमदारांच्या अपात्रतेचा निकाल बुधवारी येणार आहे. निकालापूर्वीच विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी स्पष्ट संकेत दिले आहे. माध्यमांशी बोलताना त्यांनी राज्यघटनेच्या दहाव्या अनुसूचीमधील कलमांचा योग्य वापर करणार असल्याचं म्हटलंय.

राहुल नार्वेकर म्हणाले की, आजचा निकाल हा मुलभूत हक्कासंदर्भातला महत्त्वाचा निर्णय असणार आहे. यामध्ये कुठल्याही त्रुटी राहणार नाहीत, अशी काळजी आम्ही घेतली आहे. कायद्याचं तंतोतंत पालन केलं जाईल आणि निकालामधून सर्वांना न्याय मिळेल.

Rahul Narvekar Latest Marathi News
Sunil Prabhu : शिंदेंच्या वकीलाशी भिडले अन्...खडतर परिस्थितीतही ठाकरेंसोबत सावलीसारखे उभे राहीले, सुनील प्रभू पात्र की अपात्र?

नार्वेकर पुढे म्हणाले की, निकालामध्ये कायद्याच्या दहाव्या अनुसूचीमधील कलमांचा योग्य प्रकारे वापर करण्यात येणार आहे. आजपर्यंत काही प्रोव्हिजनचं इंटरपिटीशन झालेलं नाही. अशी परिस्थिती कधी उद्भवली नव्हती. त्यामुळे या प्रोव्हिजन्सचा वापर केला जणार आहे. अपवादात्मक परिस्थितीमुळे त्या कलमांचा वापर केला जाईल, असं नार्वेकरांनी स्पष्ट केलं. त्यामुळे काही विशिष्ट कलमांचा वापर करुन शिंदे गटाच्या बाजूने निर्णय जाईल का? असा प्रश्न आणि तसे संकेत दिसून येत आहेत.

Rahul Narvekar Latest Marathi News
Pankaja Munde: पंकजा मुंडे अडचणीत! वैद्यनाथ साखर कारखान्याचा होणार लिलाव, बँकेची नोटीस

शिवसेना शिंदे गटाचे 16 आमदार

1) एकनाथ शिंदे 2) चिमणराव पाटील

3) अब्दुल सत्तार 4) तानाजी सावंत

5) यामिनी जाधव 5) संदीपान भुमरे

7) भरत गोगावले 8) संजय शिरसाठ

9) लता सोनवणे 10) प्रकाश सुर्वे

11) बालाजी किणीकर 12) बालाजी कल्याणकर

13) अनिल बाबर 14) संजय रायमूळकर

15) रमेश बोरनारे 16) महेश शिंदे

शिवसेना ठाकरे गटाचे आमदार

1) अजय चौधरी 2) रवींद्र वायकर

3) राजन साळवी 4) वैभव नाईक

5) नितीन देशमुख 6) सुनिल राऊत

7) सुनिल प्रभू 8) भास्कर जाधव

9) रमेश कोरगावंकर 10) प्रकाश फातर्फेकर

11) कैलास पाटील 12) संजय पोतनीस

13) उदयसिंह राजपूत 14) राहुल पाटील

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.