गद्दार हे गद्दार असतात, चिन्ह अन् पक्ष उद्धव ठाकरेंसोबत - आदित्य ठाकरे

शिवसेना भवनात शिवसैनिक आणि पदाधिकाऱ्यांची बैठक पार पडली यावेळी ते बोलत आहे.
Aditya Thackeray
Aditya ThackeraySakal
Updated on

मुंबई : गद्दार हे गद्दार असतात पण ज्यांना परत यायचं आहे त्यांच्यासाठी शिवसेनेचे दारं उघडे आहेत असं वक्तव्य शिवसेनेचे आदित्य ठाकरे (Aditya Thackeray) यांनी केलं आहे. शिवसेना भवनात शिवसैनिक आणि पदाधिकाऱ्यांची बैठक पार पडली त्यावेळी त्यांनी बंड केलेल्या आमदारांवर जोरदार टीका केली. (Shivsena Aditya Thackeray On Eknath Shinde)

ज्या आमदारांना परत शिवसेनेत यायचं आहे त्यांच्यासाठी सेनेचे दारं उघडे आहेत, गद्दार हे गद्दार असतात असं आदित्य ठाकरे यांनी म्हटलं आहे. दरम्यान शिवसेना नाव आणि पक्षाचं चिन्ह मिळवण्यासाठी शिंदे गटाकडून प्रयत्न केले जात आहेत पण शिवसेना नाव आणि पक्षाचे चिन्ह उद्धव ठाकरे यांच्याकडेच राहणार आहे असंही ते म्हणाले आहेत.

Aditya Thackeray
भाजप आमदार नितेश राणे थेट वावरात; पाहा त्यांचे भातलावणीचे फोटो

दरम्यान शिंदे सरकारचा पहिल्या टप्प्यातील मंत्र्यांचा शपथविधी येत्या शनिवारी पार पडणार असल्याची माहिती मिळाली आहे. शिंदे गटाकडे महसूल तर भाजपकडे अर्थ आणि गृहमंत्रिपद जाणार असल्याची प्राथमिक माहिती समोर येत आहे. त्याचबरोबर मुख्यमंत्र्यांनी आज मंत्रालयातील मुख्यमंत्री कार्यालयाचा पदाभार स्विकारला आहे.

शिंदे यांनी शिवसेनेशी बंड करून भाजपसोबत सरकार स्थापन केल्यानंतर शिवसेनेला मोठा फटका बसलाय. सेनेचे ५५ पैकी ४० आमदार शिंदे गटात गेले आहेत. तर अजूनही काही आमदार शिंदे गटात जाण्याच्या तयारीत असल्याची माहिती आहे. सेनेचे खासदार राहुल शेवाळे यांनी उद्धव ठाकरे यांना पत्र लिहित भाजपच्या राष्ट्रपती पदाच्या उमेदवार द्रौपदी मुर्मू यांना मतदान करण्याची मागणी केली आहे. तर माजी खासदार आनंदराव अडसूळ यांनी काल आपल्या शिवसेना नेतेपदाचा राजीनामा दिल्याने सेनेला मोठा धक्का बसला आहे.

Aditya Thackeray
Video: आजोबांचा स्वॅगच निराळा! पंच्याहत्तरीत बाईकवरुन निघाले अमरनाथ यात्रेला

एकएक करून सगळेच शिवसेना सोडताना पाहायला मिळत आहेत. याची खबरदारी घेत शिवसेनेने राज्यसभेतील आपला प्रतोद बदलला असून खासदार भावना गवळी यांची उचलबांगडी केली आहे. त्यानंतर शिवसेनेने पदाधिकाऱ्यांच्या आणि शिवसैनिकांच्या बैठकांचे सत्र चालू केले आहे. त्याचबरोबर अजूनही गद्दारांना शिवसेनेची दारं उघडे असल्याचं आदित्य ठाकरे यांनी सांगितलं आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.