कर्नाटक मुख्यमंत्री बसवराज बोम्मई यांनी या घटनेवर केलेल्या वक्तव्याचा निषेध नोंदवला जात आहे.
बंगळुरू येथील (Bengalur) छत्रपती शिवाजी महाराजांच्या (Chhatrapati Shivaji Maharaj) पुतळ्याची विटंबना झाल्याच्या घटनेचे पडसाद राज्यातील अनेक (Miraj) शहरात आणि परिसरात उमटले आहेत. या घटनेमुळे राज्यातील राजकीय वातावरणही तापले आहे. दरम्यान कर्नाटक मुख्यमंत्री बसवराज बोम्मई (Basavraj Bommoi) यांनी या घटनेवर केलेल्या वक्तव्याचा निषेध नोंदवला जात आहे. या पार्श्वभूमीवर राज्यात ठिकठीकाणी आंदोलन करण्यात येत आहेत. मुंबईतील (Mumbai) लालबाग परिसरातही आंदोलन करण्याता आले आहे. यावेळी शिवसेना नेते अरविंद सावंत (Arvind Sawant) यांनी भाजपाच्या (BJP) नेत्यांवर टीका केली आहे.
ते म्हणतात, कर्नाटकात (Karnatak) भाजप सरकार आहे. तरीही देशासाठी दैवत असणाऱ्या शिवरायांचा अपमान होतो आणि कोणतीच कारवाई होत नाही हे दु्र्दैवी आहे. कानडी बांधवांनो, तुम्ही महाराष्ट्रात रहाता इथे तुम्हाला त्रास होत नाही. शाळा बंद केल्या जात नाहीत. तुम्ही तुमच्या सरकारला सांगा अन्यथा महाराष्ट्रात (Maharshtra) राहणं कठीण होईल असा इशाराही त्यांनी दिला आहे. यावेळी त्यांनी भाजपा नेत्यांवरही हल्लाबोल केला आहे. चंपा असो वा दंफा असो. कोणतीही मनमानी चालवून घेणार नसल्याचेही ते म्हणाले आहेत.
आम्ही आमचं पाणी राखतो. अजूनही सत्व आणि तत्व सोडलेलं नाही. आम्हाला आमचा मूळ स्वभावाला यायला देऊ नका. महाराजांच्या अवमानाबाबत सगळ्यांची बोबडी वळली आहे. ते धगधगत्या अग्नीसारखे होते. परकीय शत्रूलाही त्यांचा दरारा होता. शिवरायांचे नाव पंतप्रधानांनीही घेतलं आहे. भाजपाने कर्नाटक (Karnataka) मुख्यमंत्री बोम्मईंचा राजीनामा घेऊन, आम्ही छत्रपतींसोबत असल्याचे दाखवून द्यावे. परंतु भाजपा म्हणजे बोलतील एक करतील एक असे लोक आहेत. तुम्ही राजकारणासाठी छत्रपतींचे नाव घेता आहात हे लक्षात घ्या, असा दम त्यांनी दिला आहे.
दरम्यान, बेळगावातील (Belgaum) महाराष्ट्र एकीकरण समिती अध्यक्षवर शाई फेक प्रकणावर ते म्हणाले, अध्यक्षांवर फेकलेली शाईच महाराजांवर फेकली आहे. आता लोक दरवाजावर येतील त्यामुळं काळजी घ्या. छत्रपतींचा अवमान करणाऱ्या बोम्मईंचा राजीनामा घेण्यासाठी महाराष्ट्रातील प्रत्येक घराघरातून पत्र गेलं पाहिजे. कारण पेटून उठणं हे शिवसेनेनं शिकवलं आहे, असेही ते म्हणाले आहेत.
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.