Shivsena Ayodhya Visit : अयोध्येला निघालेली ट्रेन दोनदा थांबवली; पदाधिकारी-शिवसैनिक आमनेसामने

Shivsena Ayodhya Visit train to ayodhya halted twice at Manmad due to clashes between Shiv Sena workers
Shivsena Ayodhya Visit train to ayodhya halted twice at Manmad due to clashes between Shiv Sena workers
Updated on

शिवसेनेच्या वतीने अयोध्या दौऱ्याचे आयोजन करण्यात आलं असून आज (७ एप्रिल) ठाणे आणि नाशिक येथून एक-एक ट्रेन अयोध्येच्या दिशेने रवाना झाली. हे उद्या रामभक्त अयोध्येत दाखल होतील. तर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे ९ एप्रिल रोजी अयोध्या दौऱ्यावर जाणार आहेत.

.

अयोध्या दौऱ्यासाठी नाशिकवरून आयोध्येला स्पेशल ट्रेन सोडण्यात आल्या आहेत. मात्र नाशिकमधून निघालेली ही स्पेशल ट्रेन नाशिक जिल्ह्यातील मनमाड येथे थांबवावी लागल्याचा प्रकार समोर आला आहे. या चालत्या ट्रेनमध्ये वाद सुरू झाल्याने मनमाड परिसरात ट्रेनची चैन खेचून दोनदा ट्रेन थांबवण्यात आली होती.

हेही वाचा - सामान्यांचा पैसा सुरक्षित ठेवण्यासाठीच Virtual Currency करकक्षेत

Shivsena Ayodhya Visit train to ayodhya halted twice at Manmad due to clashes between Shiv Sena workers
लेकाच्या फीसाठी बँकेनं कर्ज नाकारलं; उच्च व तंत्रशिक्षण मंत्र्यांच्या जिल्ह्यात शेतकरी बापाची आत्महत्या

मालेगावचे शिवसैनिक आणि शिवसेना पदाधिकाऱ्यांत बोगीत बसण्यावरू वाद झाल्याने ट्रेन थांबवावी लागली. या प्रकारा मुळे तब्बल अर्धा तास ट्रेन थांबवून ठेवण्यात आली. यानंतर पोलिस आणि रेल्वे प्रशासनाच्या मध्यस्थीनंतर ट्रेन पुढे निघाली. दरम्यान चालत्या ट्रेनमध्ये देखील वाद सुरू असल्याची माहिती मिळत आहे.

Shivsena Ayodhya Visit train to ayodhya halted twice at Manmad due to clashes between Shiv Sena workers
Ajit Pawar News : पुणे दौरा अर्धवट सोडून अजित पवार गेले कुठे? या पूर्वीही…

दरम्यान ठाणे येथे रामभक्तांना निरोप देण्यासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे रेल्वे स्थानकावर दाखल झाले होते. यावेळी त्यांनी राम मंदिर, बाळासाहेब ठाकरे, नरेंद्र मोदी, काँग्रेस या सगळ्या विषयांवर भाष्य केलं. महत्त्वाचं म्हणजे राम मंदिरासाठी लागणारं सागाचं लाकूड महाराष्ट्रातून जातं, याचा आपल्याचा आनंद आणि अभिमान असल्याचं शिंदे म्हणाले.

काय म्हणाले एकनाथ शिंदे?

  • अयोध्येसाठी एक ट्रेन ठाणे आणि एक ट्रेन नाशिमधून निघाली आहे.

  • शिवसैनिक आणि रामभक्त उद्या अयोध्येत पोहोचतील, परवा दर्शन होईल.

  • त्यांना आज निरोप द्यायला मी स्वतः आलो आहे.

  • अयोध्या हा आमच्यासाठी अतिशय श्रद्धेचा, भक्तीचा, अस्मितेचा विषय आहे.

  • रामभक्तांची टीम रवाना झाली आहे.

  • आमच्यामुळे का होईना अनेक लोक (काँग्रेस) रामलल्लाचं दर्शन घ्यायला जाणार आहेत.

  • नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली भव्यदिव्य राममंदिराचं स्वप्न पूर्ण होत आहे.

  • राम मंदिर व्हावं, अशी खुद्द बाळासाहेबांची इच्छा होती.

  • मंदिरासाठी लागणारं सागाचं लाकूड जात आहे, ते महाराष्ट्रातून जात आहे.

  • ही महाराष्ट्राची आनंदाची आणि समाधानाची बाब आहे.

  • मुख्यमंत्री आदित्यनाथ यांची मी भेट घेणार आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.