Uddhav Thackrey: आता महिला चालवणार राज्याचा कारभार? उद्धव ठाकरेंच्या विधानामुळे रंगली चर्चा

राज्याला पहिली महिला मुख्यमंत्री देणार असं विधान उद्धव ठाकरे यांनी मुंबईत कार्यक्रमावेळी केलं
Uddhav Thackrey
Uddhav ThackreyEsakal
Updated on

मुंबईत एका कार्यक्रमात शिवसेनेच्या ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरेंनी केलेल्या एका विधानाची चर्चा सध्या राजकीय वर्तुळात सुरू आहे. राज्याला पहिली महिला मुख्यमंत्री देणार असं विधान उद्धव ठाकरे यांनी मुंबईत कार्यक्रमावेळी केलं आहे. त्यांच्या या विधानामुळे राजकीय वर्तुळात तर्कवितर्कांना उधाण आलं आहे.

या कार्यक्रमात बोलताना उद्धव ठाकरे यांनी महाराष्ट्राच्या राजकीय रणसंग्रामासाठी रणशिंग फुंकलं आहे. उद्धव ठाकरेंच्या ठाकरे गटाचे चिन्ह म्हणून अन्याय जाळणारी मशाल आम्हाला मिळाली आहे. ही अंधःकार दूर करणारी मशाल आपण तितक्याच ताकतीने वापरू, असेही उद्धव ठाकरे यांनी सांगितले आहे.

हे ही वाचा: भारतीय उत्पादनांच्या खरेदीतली वाढ बनवेल देशाला आर्थिक महासत्ता...

काल मुंबईत लहुजी वस्ताद साळे यांच्या 228 व्या जयंतीचा कार्यक्रम होता. या कार्यक्रमावेळी उद्धव ठाकरे यांची प्रमुख उपस्थिती होती. दरम्यान कार्यक्रमात भाषण करताना उद्धव ठाकरे यांनी कार्यकर्त्यांना प्रोत्साहन दिलं आहे. पुढे बोलताना उद्धव ठाकरे म्हणाले की, राज्याचं रक्षण करण्यासाठी आपण एकत्र येऊ. शिवशक्ती भीमशक्ती आणि लहू शक्ती एकत्र आली तर देशात एक मोठी ताकद आपण उभी करू शकतो. मी सध्या ते अनुभवतोय गद्दार आता मूठभरही राहिले नाहीत. पण निष्ठावान डोंगराएवढे आहेत. आपल्याला राज्यात पुन्हा सत्ता आणायची आहे. मुख्यमंत्रीपदी आपली व्यक्ती असेल. मग टी महिला असो किंवा पुरुष असंही ते बोलताना म्हणालेत.

Uddhav Thackrey
Maharashtra Karnataka Border: सोलापूरमधील 28 गावांचा कर्नाटकात जाण्याचा निर्णय

उद्धव ठाकरे यांनी हे वक्तव्य खूप विचारपूर्वक केलं असणार यामुळे ठाकरेंच्या मनातील महिला मुख्यमंत्री कोण आहे? तो शिवसेनेचा आहे का? की बाहेरच्या पक्षाचा या चर्चांना आता उधाण आलं आहे. तसेच रश्मी ठाकरेंचंही नाव कायमच चर्चेत आहे. शिवसेनेच्या फायर ब्रँड नेत्या सुषमा अंधारेही आहेत. तर आघाडीचा विचार करता राष्ट्रवादी काँग्रेसमधील खासदार सुप्रिया सुळे यांच्या नावाचीही चर्चा आता रंगू लागली आहे.

Uddhav Thackrey
Maharashtra Politics: सावरकर ठरतायत अडचणीचे, ठाकरे गट अन् संभाजी ब्रिगेडच्या नव्या युतीत जुने मतभेद कायम

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.