Maharashtra Politics : CM शिंदेंसह १६ आमदारांच्या अपात्रतेचा फैसला लवकरच! मोठी अपडेट आली समोर

Eknath Shinde News
Eknath Shinde NewsSakal
Updated on

शिवसेनेच्या १६ आमदारांच्या अपात्रतेबाबत कारवाईकडे सर्व राज्याचे लक्ष लागले आहे. यादरम्यान आता या प्रकरणात निर्णय घेतला जाण्याच्या आशा पल्लवित झाल्या आहेत. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासह शिवसेनेच्या १६ आमदारांच्या अपात्रतेच्या कारवाईला लवकरच सुरूवात होणार असल्याची माहिती समोर आली आहे. विधानसभा अध्यक्ष येत्या आठवड्यात यासंदर्भातील कारवाईला सुरुवात करणार असल्याचे वृत्त साम टीव्हीने सूत्रांच्या हवाल्याने दिले आहे.

अपात्रतेच्या कारवाईला उशीर होत असल्याने काही महिन्यांपूर्वी विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांना सर्वोच्च न्यायालयाने याप्रकरणात निर्णय घेण्यासाठी सध्या कोणती प्रक्रिया सुरु आहे याबद्दल माहिती विचारली होती. शिवसेन पक्षात बंडखोरी झाल्यानंतर पक्षात उभी फूट पडल्याचे पाहायला मिळाली. यानंतर सुरू झालेल्या सत्तासंघर्षादरम्यान उद्धव ठाकरे गटाकडून एकनाथ शिंदे यांच्यासह १६ शिवसेना आमदारांना अपात्र करण्याची मागणी करण्यात आली.

महाराष्ट्राच्या सत्तासंघर्षाच्या सुप्रीम कोर्टाने अंतिम निर्णय दिला. यावेळी तत्कालीन उपाध्यक्ष नरहरी झिरवाळ यांनी अपात्र ठरवलेल्या १६ आमदारांबाबतचा निर्णय विधानसभा अध्यक्षांकडे सोपवण्यात आला. आता विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर हे या आमदारांचा निर्णय घेणार आहेत. सर्वोच्च न्यायालयाने निकाल देताना एकनाथ शिंदे आणि भरत गोगावले यांची गटनेते आणि प्रतोद पदी करण्यात आलेली निवड देखील चुकीचं असल्याचं म्हटलं होतं.

Eknath Shinde News
Morocco Earthquake : मोरोक्कोमध्ये 6.8 तीव्रतेचा भूकंप! 296 हून अधिक ठार, शेकडो जखमी; PM मोदींनी व्यक्त केल्या संवेदना

अपात्रतेच्या प्रकरणात शिवसेनेच्या दोन्ही गटातील (शिंदे आणि ठाकरे) आमदारांना लेखी उत्तर सादर करण्यासाठी विधानसभा अध्यक्षांनी नोटीस बजावली आहे. यानंतर शिंदे गटातील आमदारांनी तब्बल ६ हजार पानांचे लेखी उत्तर विधानसभा अध्यक्षांना पाठवले आहे. या उत्तरांची तसेच पुराव्यांची छाननी करण्यात आली असून विधानसभा अध्यक्षांनी पुढील सुनावणीसाठी उद्धव ठाकरे गट तसेच शिंदे गटातील आमदारांना देखील नोटीस पाठण्यास सुरुवात केली आहे.

त्यामुळे या आमदारांना प्रत्यक्ष विधीमंडळाच्या मध्यवर्ती सभागृहात हजर राहण्यास आदेश देण्यात आले आहेत. त्याचबरोबर अपात्रतेच्या कार्यवाहीपासून वाचण्यासाठी या आमदारांना आता युक्तीवाद करावा लागणार आहे. 

Eknath Shinde News
G20 Summit: जगातील सर्वाधिक सुरक्षित विमानाने जो बायडेन आलेत भारतात, जाणून घ्या का आहे अभेद्य

विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी जर एकनाथ शिंदे आणि त्यांच्या गटाच्या आमदारांना अपात्र ठरवले तर महाराष्ट्रातील राजकीय समीकरणे पुन्हा बदलतील. तसेच एकनाथ शिंदे यांचे मुख्यमंत्रीपद देखील जाऊ शकते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.