'भाजपाच्या धमन्यांत हिंदुत्वाचं रक्त नसून केवळ टोमॅटो सॉस'

‘किरीट सोमय्या हे भाजपाचे नाच्या असून त्यांचे सुत्रधार फडणवीस आहेत’
politics
politicsesakal
Updated on
Summary

‘किरीट सोमय्या हे भाजपाचे नाच्या असून त्यांचे सुत्रधार फडणवीस आहेत’

सध्या अनेक राजकीय मुद्द्यांवरून राज्याचे राजकारणा चांगलंच तापलं आहे. हनुमान चालिसा पठणावरून मुद्द्यावरुन सत्ताधारी महाविकास आघाडी विरुद्ध भाजपा आणि मनसे असा संघर्ष दिसूत आहे. अमरावतीच्या खासदार नवनीत राणा आणि आमदार रवी राणा यांनी मुख्यमंत्र्याच्या ‘मातोश्री’ या निवासस्थानासमोर हनुमान चालिसा पठण करण्याचं आव्हान दिल. यामुळे शिवसैनिक आक्रमक झाले. या प्रकरणात राणा दाम्पत्याला न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली आली आणि भाजपाने या मुद्द्यावरुन कायदा सुव्यवस्थेसंदर्भात प्रश्नचिन्हं उभी केली असून भाजपा नेते किरीट सोमय्यांवर खार पोलिस स्टेशनबाहेर हल्ला झाल्याने वातावरणत आणखी भर पडली आहे. या सर्व घडामोडींचा समाचार आज सामना अग्रलेखात घेण्यात आला असून दादा कोंडके असते तर त्यांनी नवा सोंगाड्या चित्रपट काढला असता, असा खोचक टोला शिवसेनेनं लागवला आहे. या शिवाय ‘किरीट सोमय्या हे भाजपाचे नाच्या असून त्यांचे सुत्रधार फडणवीस आहेत,’ अशी टीकाही शिवसेनेनं केली आहे.

यात भाजपाचे किरीट किरीट सोमय्या आणि विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्यावर निशाणा साधला आहे. भाजपाच्या धमन्यांत सच्चेपणाचे, हिंदुत्वाचे रक्त नसून टोमॅटो सॉस आहे हे बाहेर आले व त्याबद्दल महाराष्ट्र सरकारवर कठोरात कठोर कारवाई करावी, म्हणजे ‘प्रेसिडेंट रुल’ लावावा, अशी मागणी फडणवीसांकडून करण्यात आली आहे. रक्ताऐवजी धमन्यांत टोमॅटो सॉस भरला की, अशा भन्नाट कल्पना एखाद्या राजकीय पक्षाला सुचू शकतात. सोमय्यांच्या गालावरून टोमॅटो सॉस टपकल्याने राज्यात कायदा व सुव्यवस्थेची स्थिती बिघडली आहे काय? यावर गृहमंत्री वळसे-पाटलांनी याचा तपास करण्यासाठी फडणवीसांच्याच अध्यक्षतेखाली एक चौकशी समिती नेमायला हरकत नाही,” असा खोचक टोला शिवसेनेनं लगावला आहे.

politics
सर्व राज्यांच्या मुख्यमंत्र्यांसोबत आज पंतप्रधान मोदींची बैठक

२०१९ सालात सत्ता गमावल्यापासून फडणवीस वगैरे लोकांना हे राज्य आपले वाटेनासे झाले आहे. महाराष्ट्राचे मीठ त्यांना बेचव लागू लागले आहे. महाराष्ट्रावर कठोर कारवाई करा म्हणजे काय करायचे? तर या मंडळींना वाटतेय म्हणून राष्ट्रपती राजवट लावून मोकळे व्हायचे. आता महाराष्ट्रात राष्ट्रपती राजवट लावण्यासाठी जी कारणे दिली आहेत त्यावर काय बोलायचे! दादा कोंडके हयात असते तर त्यांनी या बोगस कारणमीमांसेवर दुसरा ‘सोंगाड्या’ चित्रपट काढला असता,” असा उपरोधिक टोलाही शिवसेनेनं ‘सामना’च्या अग्रलेखामधून लागवलाय.

राणा दाम्पत्यावर बोलताना, अमरावतीच्या खासदार-आमदार पती-पत्नीवर पोलिसांनी त्यांच्या अतिरेकी वागण्याबद्दल कारवाई केली. महाराष्ट्रात हनुमान चालिसा वाचायची असेल तर ती तुमच्या घरात वाचा. कोणी अडवलंय? पण दुसऱ्यांच्याच घरात जाऊन वाचू हा अट्टहास का, असा प्रश्न मुंबईच्या हायकोर्टानेही विचारला आहे. तरीही राणा दांपत्यावरील कारवाई म्हणजे हिटलरशाही वगैरे असल्याचे फडणवीस बोलतात. श्रीमती राणांचा छळ केला, त्यांना साधे पाणीही दिले नाही. त्या मागासवर्गीय आहेत म्हणून त्यांचा छळ केला, अशी थिल्लर पद्धतीची विधाने करणे फडणवीस यांना तरी शोभत नाही. असंही शिवसेनेनं म्हटलं आहे.

politics
पक्षकाराकडून वकिलाच्या अंगावर पेट्रोल ओतून जिवंत जाळण्याचा प्रयत्न

किरीट सोमय्या हा भाजपाचा एक नाच्या असून या नाच्याचे सूत्रधार स्वतः फडणवीस आहेत हे आता स्पष्ट झाले. सोमय्या यांनी ‘आयएनएस विक्रांत वाचवा’ या नावाखाली पैसे जमवून अपहार केला. त्यांच्यावर गुन्हा नोंद झाला. हे महाशय सध्या जामिनावर सुटले आहेत. दुसरे असे की, पीएमसी बँक घोटाळ्यातील सोमय्यांचे टेबलाखालचे व्यवहार उघड झाले, त्या प्रकरणाची चौकशी सुरू झाली आहे. या नाच्याने स्वतःच्या गालावर टोमॅटो सॉस फासले व शिवसैनिकांनी हल्ला केला म्हणून बोंब ठोकली. खार पोलीस ठाण्याच्या हद्दीत हे नाटक घडले. सोमय्यांवर दगड मारले त्यामुळे त्यांच्या गाडीची काच फुटली. ती काच त्यांच्या हनुवटीस लागली. त्यामुळे रक्त आले नाही, तर टोमॅटो सॉस बाहेर आला. हा चमत्कारच म्हणायला हवा!,” असा सणसणीत टोलाही शिवसेनेनं लगावला आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.