Shivsena: मेळाव्याआधीच धनुष्यबाणाचा निर्णय होणार? आयोगासमोर आजच युक्तीवाद

अंधेरी पोटनिवडणुकीआधी निर्णय होण्याची शक्यता आहे.
Shivsena
ShivsenaSakal
Updated on

मुंबई : राज्यात शिवसेनेच्या दोन्ही गटाचा दसरा मेळावा पार पडत असताना काही काळ आधी शिवसेनेच्या पक्षचिन्हाबाबत निर्णय होण्याची शक्यता आहे. केंद्रीय निवडणूक आयोगासमोर आज शिवसेनेला युक्तीवाद करावा लागणार आहे. तर एकीकडे सेनेचे दोन मेळावे पार पडत असताना दुसरीकडे धनुष्यबाणाबाबत निर्णय होणार आहे.

(Eknath Shinde vs Uddhav Thackeray Latest News Updates)

दरम्यान, आमदारांच्या निलंबनाचा निर्णय सुप्रीम कोर्टात असताना निवडणूक आयोगाने पक्षचिन्हाबाबत निर्णय देऊ नये अशी याचिका शिवसेनेने दाखल केली होती. त्यानं २७ सप्टेंबर रोजी सुप्रीम कोर्टाने निवडणूक आयोगाच्या निर्णयावरील स्थगिती उठवली होती. निवडणूक आयोग आपला निर्णय घेण्यास मोकळं झाल्यामुळे शिवसेनेला मोठा धक्का बसला आहे. तर या प्रकरणी आज केंद्रीय निवडणूक आयोगासमोर शिवसेनेला युक्तीवाद करावा लागणार आहे. त्यामुळे शिवसेनेचे काही निवडक पदाधिकारी कागदपत्र घेऊन दिल्लीत दाखल झाले आहेत.

Shivsena
Uttarakhand Bus Accident: बस दरीत पडून अपघात; 25 जणांचा मृत्यू

शिवसेनेच्या युक्तीवादानंतर लगेच युक्तीवाद होणार असल्याच्या चर्चा आहेत. तर अंधेरी पूर्व येथील पोटनिवडणुकीच्या आधी निवडणूक आयोग निर्णय देणार असल्याची माहिती सूत्रांकडून मिळाली आहे. तर युक्तीवादात कोणते मुद्दे मांडायचे याबाबत शिवसेनेचे पदाधिकारी उद्धव ठाकरे यांच्या संपर्कात असल्याची माहिती आहे.

दरम्यान, ३ नोव्हेंबर रोजी या पोटनिवडणुकीसाठी मतदान होणार असून ६ नोव्हेंबर रोजी मतमोजणी होणार आहे. तर या निवडणुकीच्या आधी आयोगाने पक्षचिन्हाबाबतीत निर्णय दिला नाही तर उमेदवार उतरवण्यासाठी शिंदे आणि ठाकरे गटासमोर संभ्रम निर्माण झाला आहे. तर निकाल लागला नाही तर शिंदे गट भाजपकडून आपला उमेदवार उभा करणार असल्याच्या चर्चा सुरू झाल्या आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.