Shivaji Park : ही तर शिंदेंची खेळी; BKC वर शिवतीर्थापेक्षा तोबा गर्दी जमवणार?

मुंबई उच्च न्यायालयाने उद्धव ठाकरेंना म्हणजेच शिवसेनेच्या दसरा मेळावा घेण्यासाठी परवानगी दिली आहे.
Dasara Melava 2022 Shivaji Park shiv sena thackeray shinde politics mumbai
Dasara Melava 2022 Shivaji Park shiv sena thackeray shinde politics mumbaiesakal
Updated on

Shivaji Park Dasara Melava : गेल्या अनेक दिवसांपासून शिवाजी पार्कवर दसरा मेळावा कोण घेणार याचा पेच निर्माण झाला होता. मात्र, आज मुंबई उच्च न्यायालयाने उद्धव ठाकरेंना म्हणजेच शिवसेनेला या ठिकाणी दसरा मेळाव्यासाठी परवानगी दिली आहे. मात्र, मेळाव्यासाठी शिवाजी पार्क पाहिजे असे म्हणत शिंदेंनी या मैदानाची आणि दसरा मेळाव्याची उत्सुकता बरीच वाढवली होती. परंतु, मधल्या काळात शिंदे गटाने बीकेसीचे मैदान बुक केले, अशा प्रकारची खेळी करण्यामागे शिंदेंचाच हात असल्याचे बोलले जात आहे.

Dasara Melava 2022 Shivaji Park shiv sena thackeray shinde politics mumbai
Dasara Melava : शिंदे गट ठोठावणार सुप्रीम कोर्टाचा दरवाजा! HC च्या निर्णयावर नाराजी

मैदानाचा एकूण आकार लक्षात घेता बीकेसीच्या तुलनेत शिवाजी पार्क छोटे आहे. त्यामुळे शिवाजी पार्कच्या तुलनेत बीकेसीत आयोजित दसरा मेळाव्याला शिवसेनेपेक्षा अधिक श्रोते जमवून शिंदेंना एकप्रकारे शक्ती प्रदर्शनच करायचे असल्याचे सांगितले जात आहे. मेळाव्यासाठी मोठ्या प्रमाणात गर्दी जमवण्यासाठी शिंदे गटाकडून जोरदार तयारीदेखील केली जात आहे.

यासाठी बस, ट्रेनचे बुकिंग सुरू करण्यात आले असून, शिंदे गटाच्या मेळाव्याला मुंबईला जाण्यासाठी जळगाव जिल्ह्यातूनच मुंबईकडे जाणाऱ्या 3 रेल्वेगाड्या बुक करण्यात येणार असल्याचे सांगितले जात आहे. शिंदे गटाकडून या प्रत्येक ट्रेनसाठी 25 लाख रुपये याप्रमाणे तब्बल 75 लाख रुपये मोजण्यात येणार आहेत. एवढेच नव्हे तर, प्रत्येक आमदाराला त्यांच्या मतदारसंघातून मेळाव्यासाठी नागरिकांना आणण्याचे टार्गेट देण्यात आले आहे.

Dasara Melava 2022 Shivaji Park shiv sena thackeray shinde politics mumbai
Dasara Melava : रश्मी ठाकरेंचा वाढदिवस अन् ठाकरेंना मिळाली मेळाव्याची 'गोड' बातमी

शिंदे गटात जळगावातील मंत्री गुलाबराव पाटील यांच्यासह एरंडोलचे चिमणराव पाटील, मुक्ताईनगरचे चंद्रकांत पाटील, पाचोऱ्याचे चंद्रकांत पाटील व चोपड्याच्या लता सोनवणे असे एकूण 5 आमदार आहेत. त्यांच्या प्रत्येक मतदारसंघातून मेळाव्यासाठी नेण्याच्या गर्दीचे नियोजन झाले असल्याचे सांगण्यात येत आहे.

Dasara Melava 2022 Shivaji Park shiv sena thackeray shinde politics mumbai
Dasara Melava : सेनेला परवानगी मिळाल्यानंतर फडणवीसांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...

तर, आपल्या शिवसेनेला मैदान अपुरे पडले असते

दुसरीकडे, न्यायालयाने शिवसेनेला दसरा मेळाव्याला परवानगी दिल्यानंतर शिंदे गटातील मंत्री दादा भुसे यांनी प्रतिक्रिया दिली आहे. ते म्हणाले की, न्यायालयाचा निर्णय स्वीकारत असल्याचे ते म्हणाले. मात्र, छत्रपती शिवाजी पार्क हे जे मैदान आहे त्याच्यापेक्षा बीकेसी हे मोठे मैदान आहे. जर शिंदे गटाला शिवाजी पार्क मिळाले असते तर, आपल्या शिवसेनेच्या मेळाव्याला कदाचित हे मैदान अपुरे पडले असते. कारण बीकेसीवरील मेळावा हा दिव्य असा होणार असल्याचा विश्वास भुसे यांनी व्यक्त केला आहे. शिवसैनिक आपल्या आपल्या पद्धतीने काम करत असतात. त्यामुळे शिंदे जो काही निर्णय घेतील आणि ज्या मैदानावर मेळावा होईल तो भव्य दिव्य होईल असे ते म्हणाले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.