Sharad Pawar: काय झाडी काय डोंगरवाले शहाजीबापू शरद पवारांच्या झाडाची फांदीच! स्वतःचं सांगितलं...

'मी कुठेही असलो तरी शरद पवारांच्या झाडाची फांदीच', शिंदे गटातील नेत्याचं वक्तव्य
Sharad Pawar
Sharad PawarEsakal
Updated on

‘काय झाडी... काय डोंगार... काय हाटील...’ या डायलॉगमुळे राज्यभरात चर्चेत आलेले सांगोल्याचे शिवसेनेचे आमदार शहाजी पाटील पुन्हा एकदा आपल्या भाषणादरम्यान केलेल्या फटकेबाजीमुळे चर्चेत आले आहेत. भाषणात त्यांनी उद्धव ठाकरे यांच्यावरील प्रेमापोटीच आपण शिवसेनेत प्रवेश केल्याचे जाहीर सांगितले. तर कोण कुठेही असले तरी शेवटी शरद पवारांच्या फांद्या असल्याचे सांगत, शरद पवारांवर आपली किती निष्ठा आहे हे ही त्यांनी स्पष्ट सांगितले. राजकारणात कुणी कुणाचं नसतं, सगळ्यांना गोड बोलून कामं करावी लागतात. शरद पवार, शिंदे साहेब यांच्यासह अनेक राजकीय नेते मला आपलं मानतात, असेही आमदार पाटील यांनी स्पष्ट केले.

आमदार पाटील यांच्या राजकीय फटकेबाजीमुळे शिवसेनेच्या कार्यकर्त्यांमध्ये संभ्रम निर्माण झाला आहे. गार्डी (ता. पंढरपूर) येथील विविध विकासकामांचे भूमिपूजन आमदार शहाजी पाटील यांच्या हस्ते आज (गुरुवारी) करण्यात आले. या कार्यक्रमाप्रसंगी बोलताना त्यांनी अनेक राजकीय गुपितं स्पष्ट केली.

Sharad Pawar
Sharad Pawar: राष्ट्रवादी होणार दिल्लीत बेघर? केंद्र सरकार देणार आणखी एक झटका

आमदार पाटील म्हणाले, काँग्रेसने मला काहीच कमी केले नव्हते. सोलापूर जिल्ह्यातील काँग्रेसचे पहिले तिकीट आठ दिवस अगोदर जाहीर व्हायचं. नंतर विजयसिंह मोहिते- पाटील आणि सुधाकर परिचारक यांच्यासह इतर नेत्यांची तिकिटं जाहीर व्हायची. इतकं सगळं मला काँग्रेसने दिल्यानंतरही मी केवळ ठाकरे घराण्यावरील प्रेमापोटीच शिवसेनेत प्रवेश केला. ठाकरे घराण्यावर प्रेम नसतं तर मी शिवसेनेत गेलोच नसतो. आजही माझ्या मनात ठाकरे घराणे आणि उद्धव यांच्याविषयी आदर आहे.

शरद पवार, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे दोघेही आज मला आपलं म्हणतात. मी ही गोड बोलून त्यांच्याकडून कामे करून घेतो. सध्या सुरू असलेल्या राजकारणामध्ये कोणीच कुणाचं नाही. त्यामुळे आपली कामं करून घ्या, असे वक्तव्यही आमदार पाटील यांनी केले. राजकारणात मी कुठेही असलो तरी शेवटी शरद पवारांच्या झाडाची फांदी आहे. भाजप, शिवसेनेतील अनेक नेत्यांचे शरद पवारांशी प्रेमाचे संबंध आहेत. राजकारणात चाललेला हा नवा खेळ असला तरी मी लहानपणापासून राजकारणाचा खेळ खेळत आहे, असे ते म्हणाले.

Sharad Pawar
Mahavikas Aghadi: ऐतिहासिक भेट! पवारांसोबतच्या भेटीनंतर राहुल गांधी ठाकरेंच्या भेटीसाठी 'मातोश्री'वर जाणार

काल-परवाच पवारांवर आरोप अन्‌ आज उपरती!

दरम्यान, काल-परवाच शहाजीबापूंनी उद्धव ठाकरेंच्या मार्फत माझं तिकीट कापण्याचा शरद पवारांचा प्लॅन होता, असं विधान केलं होतं. आज त्यांनी अचानक पवारांबद्दल आदर व्यक्त केल्याने सर्वांच्याच भुवया उंचावल्या आहेत.

Sharad Pawar
MNS Politics: मनसेला खिंडार! गजानन काळेंवर आरोप करणारे मुंबईचे उपशहर प्रमुख शिंदे गटात

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.