मुंबई : "शिवसेना हा केवळ पक्ष नाही तर हे एक कुटुंब आहे. पण एकनाथ शिंदे गटाने आपल्या आईला बाजारात विकलंय, कारण शिवसेना हा एकमेव पक्ष आहे त्याचा उच्चार स्त्रीलिंगी आहे. त्यामुळे या पक्षाला आईचे स्थान आहे. या आईला त्यांनी बाजारात विकलंय" अशी संतप्त प्रतिक्रिया मुंबईच्या माजी महापौर आणि शिवसेना नेत्या किशोरी पेडणेकर यांनी व्यक्त केली आहे.
"शिंदे गटाने विनाकारण पक्षाच्या चिन्हावर दावा केला. कमळ हेच शिंदे गटाचे खरं चिन्ह आहे. त्यांच्याविषयी चीड लोकांच्या मनात आहे पण राजकीय क्रौर्य किती भयानक आहे याची प्रचिती आता आली. निवडणूक आयोगाच्या कानात कुणीतरी सांगितलं आहे म्हणून असा निर्णय आला" असं त्या बोलताना म्हणाल्या. तसेच बापाचं नाव घ्यायला कुणाच्या न्यायाची गरज नाही असं म्हणत पोटनिवडणुकीत 'शिवसेना बाळासाहेब ठाकरे' हेच आमच्या पक्षाचं नाव असेल असं सूतोवाच त्यांनी केलं.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.