Aaditya Thackeray : स्वतःला विकलं ते पुरं झालं ...६ हजार कोटींच्या घोटाळ्यावरुन ठाकरेंनी साधला CM शिंदेंवर निशाणा

माझ्या आरोपानंतर पालिकेने पत्रक काढलं त्यात स्पष्टता नाही
Aaditya Thackeray
Aaditya ThackerayEsakal
Updated on

स्वतःला विकलं ते पुरं झालं मुंबई आता विकू नका अशा शब्दात शिवसेना नेते आदित्य ठाकरे यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर निशाणा साधला. मुंबई शहरात रस्त्यांच्या अनुषंगाने विविध कामे सुरु आहे. पण महापालिकेवर प्रशासक असताना ४०० किमी रस्त्यांचा प्रस्ताव दिला कुणी? असे अनेक सवालही त्यांनी उपस्थित केले.

मुंबई महापालिकेतील निविदा प्रक्रियेवर आदित्य ठाकरेंनी काही प्रश्न उपस्थित करणारं पत्र पालिका आयुक्त इक्बाल सिंह चहल यांना लिहिलं आहे. याची माहिती त्यांनी आज पत्रकार परिषद घेत दिली.

Aaditya Thackeray
Kasba Election : 'कसबा झालाय भकास...', पोटनिवडणूक बिनविरोध होऊ नये म्हणून पुण्यात पोस्टरबाजी

काय म्हणाले ठाकरे?

मुंबई शहरात रस्त्यांच्या अनुषंगाने विविध कामे सुरु आहे. पण महापालिकेवर प्रशासक असताना ४०० किमी रस्त्यांचा प्रस्ताव दिला कुणी? असा सवाल करुन ६ हजार कोटींचं काम प्रशासकाने मंजूर करणं किती योग्य आहे? हे लोकशाहीला धरुन आहे का? ही रस्त्यांची कामे बजेटमध्ये कसे दाखवणार? अशा प्रश्नांचा भडीमार आदित्य ठाकरे यांनी केला.

हे ही वाचा : आर्थिक निर्णय घेताना बनू नका चिंतातूर जंतू....

मुंबई महापालिकेतील निविदा प्रक्रियेवर माझ्या आरोपानंतर BMC ने प्रेसनोट काढली. निविदा रद्द करण्याऐवजी प्रेसनोट काढून उत्तरं देण्याचा आयुक्तांनी प्रयत्न केला. पण मूळ प्रश्न राहतो ४०० किमी रस्त्यांचा प्रस्ताव दिला कुणी? ६ हजार कोटींचं काम प्रशासकाने मंजूर करणं किती योग्य? हे लोकशाहीला धरुन आहे का? बजेटमध्ये कसे दाखवणार? कामं तर मंजूर झाली पण ६ हजार कोटींच्या रस्त्यांची डेडलाईन ठरलीये का? असे सवाल उपस्थित करत आयुक्तांचं हे काम म्हणजे प्रत्येक पक्षाच्या नगरसेवकाचा अपमान आहे, अशी टीका आदित्य ठाकरे यांनी केली.

या पत्रानंतर निविदा रद्द करण्याऐवजी BMC ने प्रेसनोट काढली. पण महापालिकेची मुदत संपलेली असताना प्रशासकाने हजारो कोटींची कामे मंजूर करणं योग्य आहे का? असा सवाल आदित्य ठाकरे यांनी केला. आगामी मुंबई महापालिका निवडणूक तसेच विधानसभा आणि लोकसभा निवडणुका डोळ्यासमोर ठेऊन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मुंबई शहरात कामांचा धडाका लावला आहे. पण निविदा प्रक्रिया कायद्याला धरुन नसल्याचा आरोप करत आदित्य ठाकरे यांनी आयुक्त इक्बाल सिंह चहल यांना अनेक सवाल उपस्थित केले आहेत.

Aaditya Thackeray
Gulabrao Patil : "अजित पवारांनी पहाटेची चूक सुधारली! पण उद्धव ठाकरे..."

मुंबई महापालिकेत ठराविक लोकांनाच कंत्राटं दिली जातायेत. गद्दारांची टोळी पालिकेवर हात मारुन जाईल पण मुंबईचं नुकसान होईल. स्वत:ला विकलं ते पुरे झालं, आता मुंबईला विकू नका, अशी खरमरीत टीका आदित्य ठाकरे यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर केली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.