थोडक्यात वाचलं आदित्य ठाकरेंचं मत; वेळीच लक्षात आल्याने अनर्थ टळला!

निवडणूक आयोगाने घडल्या प्रकाराची त्वरीत दखल घेत कारवाई केली.
Aditya Thackeray
Aditya ThackeraySakal
Updated on

राज्यसभा निवडणुकीची धामधूम सध्या सुरू आहे. मतदानाची वेळ आता संपत आली. जवळपास सर्वच पक्षांच्या आमदारांचं मतदान आता पूर्ण होत आलंय. दरम्यान, आदित्य ठाकरे मतदानासाठी गेलेले असताना एक गोंधळ झाला. मात्र हा गोंधळ वेळीच लक्षात आल्याने आदित्य ठाकरेंचं मत वाया जाता जाता राहिलं आहे.

Aditya Thackeray
राष्ट्रवादीला फटका... मलिकांची सुधारित याचिकाही फेटाळली!

शिवसेना नेते आणि राज्याचे पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे हे मतदान करण्यासाठी विधानभवनात दाखल झाले होते. मतदानासाठी गेलेले असताना त्यांना मतदान करण्यासाठी मिळालेल्या मतपत्रिकेवरती आयोगाचा शिक्काच नसल्याचं आढळून आलं. या प्रकरणाची गंभीर दखल घेत निवडणूक आयोगाने ती मतपत्रिका बाजूला ठेवली आणि शिक्का असलेली नवी पत्रिका आदित्य ठाकरेंना दिली. त्यानंतर आदित्य ठाकरेंनी मतदान केलं.

Aditya Thackeray
Rajyasabha Election : सहावी जागा भाजपाकडे; पवारांचा पराभव करत महाडिक विजयी

दरम्यान, आत्तापर्यंत बहुतांश आमदारांचं मतदान झालं आहे. निवडणूक आता शेवटच्या टप्प्यात आली आहे. ४ वाजता मतदानाची वेळ संपणार आहे. संध्याकाळी ५ वाजल्यापासून मतमोजणीची प्रक्रिया सुरू होणार आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.