Ajit Pawar: "वेळ लवकरच येईल, दोघांची इच्छा आहे पण गुण.. ",अजित पवारांच्या चर्चेवर मिश्कील टीका

राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार पक्षात बंडखोरी करणार असल्याच्या चर्चांना काल उधाण आलं
Why BJP want Ajit Pawar Devendra Fadnavis maharashtra politics
Why BJP want Ajit Pawar Devendra Fadnavis maharashtra politicsEsakal
Updated on

राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार पक्षात बंडखोरी करणार असल्याच्या चर्चांना काल उधाण आलं. एका इंग्रजी वृत्तपत्राने दिलेल्या वृत्तानंतर राजकीय वर्तुळात अनेक तर्क-वितर्क लावले गेले. मात्र, त्यानंतर अजित पवारांनी, “या बातम्यांमध्ये काहीही तथ्य नाही”, असं स्पष्टीकरण काल पत्रकार परिषद घेत दिलं आहे.

दरम्यान, यावरून आता शिवसेनेचे नेते आणि मंत्री गुलाबराव पाटील यांनी मिश्किल टीका केली आहे. ते बोलताना म्हणाले की, "मला वाटतं अजून तिथी जवळ आलेली नाही. गुणही जुळत नाही. त्यामुळे कोणती पुजा करावी लागले, हे एखाद्या ब्राम्हणाला विचारायला लागेल. पण वेळ येईल काळजी करू नका," अशी प्रतिक्रिया गुलाबराव पाटील यांनी दिली आहे.

Why BJP want Ajit Pawar Devendra Fadnavis maharashtra politics
Atiq Ahmed: अतिक अहमदच्या हत्येच्या निषेधाचे महाराष्ट्रात झळकले बॅनर, केला 'शहीद' असा उल्लेख

तसेच अजित पवारांच्या भाजपा प्रवेशाचा मुहूर्त खरंच ठरला आहे का? असं विचारल्यानंतर ते म्हणाले की, 'ही वेळी लवकरच येईल. दोघांची इच्छा आहे. पण गुण जुळत नसल्याचं ब्राम्हणाचं म्हणणं आहे,' असं ते म्हणालेत.

Why BJP want Ajit Pawar Devendra Fadnavis maharashtra politics
Pune Crime: धक्कादायक! कोयता गँगमधील चार अल्पवीयन मुलांचे बालनिरीक्षणगृहातून पलायन

अजित पवारांनी भाजपमध्ये प्रवेश करण्याच्या चर्चेवर दिलं स्पष्टीकरण

दरम्यान, अजित पवार यांनीही काल याबाबत स्पष्टीकरण दिलं. “राष्ट्रवादी पक्षाची स्थापना स्वाभिमानातून झाली आहे. १० जूनला १९९९ पासून आम्ही काम करत आहे. आजही आम्ही काम करतोय, उद्याही करत राहणार. जोपर्यंत आमच्या जिवात जीव आहे, तोपर्यंत आम्ही पक्षाचं काम करत राहणार”, असं ते म्हणाले होते.

त्याचबरोबर “या बातम्या विपर्यास करून दाखवल्या जातात. अशा चर्चा सुरू झाल्याने जवळचे कार्यकर्ते नाराज होतात. संभ्रामवस्थेत जातात. परंतु, यात काहीही तथ्य नाही. प्रत्येकाने आपआपलं काम करा, महाविकास आघाडी बळकट होण्याकरता प्रयत्न करा”, असं आवाहन त्यांनी कार्यकर्त्यांना केले आहे.

Why BJP want Ajit Pawar Devendra Fadnavis maharashtra politics
Chhota Rajan: अंडरवर्ल्ड डॉन छोटा राजनचा फायनान्सर CBIच्या जाळ्यात, सिंगापूरवरून होतंय प्रत्यार्पण

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.