मुख्यमंत्री हे पालकमंत्री अनिल परब यांच्या मागे ठामपणे असल्याचं सिद्ध झालं आहे.
सध्या नगरपंचायत निवडणुकांचे (Nagar panchayat election 2021) वारे वाहत आहे. राजकीय वर्तुळात अनेक बदल होते असून एकमेकांवर आरोपप्रत्यारोप सुरु आहेत. दरम्यान, रत्नागिरी (Ratnagiri) जिल्ह्यातील शिवसेनेतील (Shivsena) रामदास कदम (Ramdas kadam) यांच्या समर्थकांना बाहेरचा रस्ता दाखवला असून शिवसेना पदाधिकाऱ्यांच्या नव्या नियुक्त्या जाहीर केल्या आहेत. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या आदेशानुसार या नियुक्त्या करण्यात आल्या आहेत. त्यामुळे मुख्यमंत्री (cm uddhav thackeray) हे पालकमंत्री अनिल परब (Anil Parab) यांच्या मागे ठामपणे असल्याचं सिद्ध झालं आहे.
दरम्यान, रत्नागिरी जिल्ह्यातील स्थानिक स्वराज्य निवडणुकांत शिवसेना (Shivsena) आणि राष्ट्रवादी काँग्रेसची (NCP) युती झाली आहे. उद्धव ठाकरे यांची आणि खासदार सुनल तटकरे यांच्यात स्थानिक निवडणुकां संदर्भात झाली चर्चा झाली आहे. दरम्यान, शिवसेना नेते रामदास कदम यांना त्यांचे वादग्रस्त ऑडिओ क्लिप प्रकरण आता चांगलेच भोवल्याचं दिसून येतं आहे. रत्नागिरी जिल्ह्यातील स्थानिक स्वराज्य निवडणुकांत शिवसेना नेते रामदास कदम आणि त्यांचे चिरंजीव आमदार योगेश कदम यांच्या समर्थकांना हटवून, तात्काळ त्यांच्या पदांवर रत्नागिरी जिल्ह्यातील शिवसेना पदाधिकाऱ्यांच्या नव्या नियुक्त्या जाहीर केल्या आहेत. त्यामुळे ऐन निवडणुकांच्या रणधुमाळीत शिवसेना नेते रामदास कदमांसह चिरंजीव आमदार योगेश कदम यांना मोठा झटका मिळाला आहे.
शिवसेनेत पक्षाशी गद्दारी करणाऱ्यांना जागा नाही. हे पुन्हा एकदा शिवसेना पक्ष प्रमुखांनी ठामपणे दाखवून दिल्याचीही चर्चा सध्या शिवसेनेत सुरू आहे. रत्नागिरी जिल्ह्यातील स्थानिक स्वराज्य निवडणुकांत शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस एकत्र भाजप विरोधात लढतील या संदर्भात शिवसेना पक्ष प्रमुख आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे स्थानिक खासदार आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते सुनिल तटकरे यांच्याशीही चर्चा झाल्याची माहिती वरिष्ठ सूत्रांनी दिली आहे. दरम्यान आता रामदास कदम यांच्या निर्णयाकडे लक्ष लागले आहे.
रत्नागिरी जिल्ह्यातील शिवसेना पदाधिकाऱ्यांच्या नव्या नियुक्त्या -
1) राजू निगुडकर उपजिल्हाप्रमुख,उत्तर रत्नागिरी
2) किशोर देसाई, विधानसभा क्षेत्रप्रमुख, दापोली विधानसभा
3) ऋषिकेश गुजर तालुकाप्रमुख, दापोली तालुका
4) संतोष गोवले, तालुकाप्रमुख, मंडणगड तालुका
5) संदीप चव्हाण - शहरप्रमुख, दापोली शहर
6) विक्रांत गवळी उपशहरप्रमुख, दापोली शहर
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.