औरंगाबाद: "पंतप्रधान नरेंद्र मोदी, (Narendra modi) केंद्रीय मंत्री महागाई, बेरोजगारीबद्दल बोलत नाहीत. देशाच्या सीमा असुरक्षित झाल्यात, त्याबद्दल बोलत नाहीत. हे भलते-सलते प्रश्न निर्माण करुन लोकांचं चित्त-विचलित करण्याचे प्रयत्न सुरु आहेत" अशी टीका शिवसेना (Shivsena) नेते आणि खासदार संजय राऊत (Sanjay raut) यांनी केली. त्यांनी आज औरंगाबादमध्ये महागाईविरोधात आक्रोश मोर्चा (Protest) आयोजित केला आहे. त्या पार्श्वभूमीवर ते बोलत होते. औरंगाबादचा मोर्चा हा महाराष्ट्रात त्या बद्दल पडलेली पहिली ठिणगी आहे, असे राऊत यांनी सांगितलं.
"भाजपा लढण्यासाठी कधीही स्वत:च हत्यार वापरत नाही. त्यांच्याकडे हत्यार नाही. ते दुसऱ्याच्या पिचलेल्या खांद्याचा वापर करतात. त्यामुळे त्यांचा प्रत्येक बार फुसका ठरतो. बॉम्ब फोडणार म्हणतात, लवंगी, फटाकाही फुटत नाही" अशा शब्दात संजय राऊत यांनी भाजपाचा समाचार घेतला.
"ईडी, सीबीआयच्या घोषणा करतात तिथूनही काही मिळत नाही. भाडोत्री राजकीय पक्ष हाताशी धरुन आम्हाला विरोध केला जातोय. शिवसेना एक हत्ती आहे. कोण पाठिमागून भुंकत असेल, तर त्याकडे लक्ष देण्याची गरज नाही" असे संजय राऊत म्हणाले.
नवाब मलिकांच्या मुद्यावर म्हणाले की, 'मुख्यमंत्री खंबीरपणे नवाब मलिकांच्या पाठिशी उभे आहेत' "नवाब मलिक न्यायाची लढाई लढत आहेत. ते मविआच्या वतीने लढत आहेत. हे प्रकरण वेळीच संपाव अशी इच्छा होती. पण भाजपाला शहाणपणा येत नसेल, तर लढाई सुरु राहील अजून काही समोर आलेलं नाही" असं राऊत म्हणाले. "इंटरवल के बाद संजय राऊत की एन्ट्री होगी. अजून मलिकांचा इंटरवल झालेला नाही. लंबा चलनेवाला पिक्चर है" असे राऊत म्हणाले. "पाठिमागून वार करतात, मर्दांसारखे समोर या. दुसऱ्यांचे खांदे आणि गंजलेल्या बंदुकांनी हल्ला करु नका. आम्ही घाबरत नाही असे राऊत म्हणाले. "आमचे नवाब मलिक सगळयांना भारी पडलेले आहेत. राज्य मंत्रिमंडळाचा त्यांना पाठिंबा आहे. मलिक चुकतायत असं कोणाला वाटत नाही" असे राऊत यांनी सांगितले.
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.