Sanjay Shirsat : दिघेसाहेबांचा घातपातच म्हणत ठाकरेंवर हल्लाबोल, नेमकं काय म्हणाले संजय शिरसाट?

दिघे साहेबांच्या अंत्ययात्रेला जाण्यासाठी यांच्याकडे वेळ नव्हता म्हणत शिरसाटांचा ठाकरेंवर हल्लाबोल
Sanjay Shirsat
Sanjay ShirsatEsakal
Updated on

शिवसेनेचे प्रवक्ते संजय शिरसाट यांनी ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांच्यावर गंभीर आरोप केले आहेत. आनंद दिघे यांच्या अंत्ययात्रेला का गेले नव्हते असा प्रश्नही शिरसाट यांनी उपस्थित केला आहे. प्रसारमाध्यमांशी बोलताना शिरसाट म्हणाले की, 'दिघे साहेबांनी आपलं आयुष्य शिवसेनेसाठी वेचलं त्यांच्या अंत्ययात्रेला उद्धव ठाकरे कुटुंबातील एकही माणूस उपस्थित नव्हता का नव्हता हा माझा प्रश्न आहे'. छत्रपती संभाजीनगरमध्ये पत्रकारांशी ते बोलत होते.

'दिघे साहेबांच्या अंत्ययात्रेला जाण्यासाठी यांच्याकडे वेळ नव्हता. यांना माहीत होतं अंत्ययात्रेला गेलं तर लोक दगडाने ठेचून मारतील. शिवसेनाप्रमुखांनी दिघे साहेबांवर आणि एकनाथ शिंदे साहेबांवर प्रेम केलं या लोकांमुळे शिवसेना वाढली.'

'त्यांनी दहा शिवसैनिकांचं नाव सांगा ज्यांना उद्धव ठाकरेंनी उभं केलं. आपण ज्यांच्या जीवावर मोठे झालो त्यांचा विसर उद्धव ठाकरेंना पडला आहे. मराठी माणसाने पाठ फिरवली हे त्यांना समजलं म्हणून उत्तर भारतीयांना आपलंस करण्याचा प्रयत्न आहे', असं संजय शिरसाट यांनी म्हटलं आहे.

Sanjay Shirsat
Sambhaji Bhide Controversy : भिडेंविरोधात राज्यभरात संतापाची लाट; वाशिममध्ये जाण्यासाठी बदलावा लागला मार्ग कारण....

दरम्यान शिरसाट यांनी आनंद दिघे यांच्या मृत्यूवरून संजय शिरसाट यांनी गंभीर आरोप केले आहेत. 'ज्यांनी दिघे साहेबांचा घात केला त्यांना ठाण्याची जनता माफ करणार नाही. तुम्ही किती प्रश्न करा, किती घोषणा करा, ठाणेकर बदला घेण्यासाठी तयार आहे. दिघे साहेबांचा घातपात आहे आणि हे सर्वांना माहीत आहे. डिस्चार्ज मिळण्याच्या मार्गावर असताना दिघे साहेबांचा मृत्यू झाला आणि लोकांनी ते सर्व पाहिले', असं संजय शिरसाट म्हणालेत.

Sanjay Shirsat
Accident News: भरधाव ट्रकची कारला धडक; अपघातात कर्तव्य बजावणाऱ्या पोलिसासह आणखी एकाचा जागीच मृत्यू, २जण जखमी

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.