Maharashtra Politics: युती तुटणार? औकातीनंतर आता शिंदे गटाचा भाजपला निर्वाणीचा इशारा

वाजपेयी यांचं सरकार एका मताने पडलं होतं हे लक्षात ठेवा म्हणत शिंदे गटाच्या नेत्याने भाजपला दिला इशारा
Maharashtra Politics
Maharashtra PoliticsEsakal
Updated on

दोन दिवसांपूर्वी सर्व वृत्तपत्रांमद्धे जाहिरात आली आणि त्यानंतर शिवसेना भाजप यांच्यात जुंपल्याचं दिसून आलं. त्यानंतर काल शिंदे गटाने सर्वांचे फोटो लावून पुन्हा जाहिरात दिली. मात्र या जाहिरातीच्या पार्श्वभूमीवर भाजप आणि शिंदे गटात आरोप प्रत्यारोप यांना सुरुवात झाली आहे. (Latest Marathi News)

दोन्ही पक्षातील नेते एकमेकांवर तोंडसुख घेताना दिसून येत आहे. भाजपचे खासदार अनिल बोंडे यांनी काल मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर हल्लाबोल करताना बेडूक कितीही फुगला तरी तो बैल होत नाही असं त्यांनी म्हंटलं आहे. तर ठाणे म्हणजे महाराष्ट्र वाटत असल्याचं म्हणत शिंदे गटाला डिवचलं होतं. त्यानंतर शिंदे गटाचे आमदार संजय गायकवाड यांनी बोंडे यांना औकातीत राहण्याचा सल्ला दिला होता. हा वाद सुरू असतानाच आता शिंदे गटाचे आमदार संजय शिरसाट यांनी भाजपला निर्वाणीचा इशारा दिला आहे.(Latest Marathi News)

Maharashtra Politics
Crime: एकतर्फी प्रेमातून युवकाचं धक्कादायक कृत्य! अल्पवयीन मुलीला पेट्रोल टाकून जाळण्याचा प्रयत्न

आमदार संजय शिरसाट यांनी माध्यमांशी संवाद साधला त्यावेळी भाजपला निर्वाणीचा इशारा देत म्हणाले कि, 'वाजपेयींच्या काळामध्ये 1 मताने सरकार पडलं होतं याचा विचार भाजपने करायला पाहिजे. हातात हात घेऊन पुढे चालावं. नाहीतर येणाऱ्या काळामध्ये अवघड होईल, असं संजय शिरसाट यांनी म्हंटलं आहे. या वादामुळे भाजप आणि शिंदे गटात अलबेल नसल्याचं स्पष्ट होतं आहे. आता शिरसाट यांच्या वक्तव्यावर भाजप काय प्रतिक्रिया देणार याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे.(Latest Marathi News)

Maharashtra Politics
Cyclone Biparjoy: एकीकडे बिपरजॉय चक्रीवादळ तर दुसरीकडे भूकंपाचे धक्के, गुजरातमध्ये IMDकडून ‘रेड अलर्ट’

अनिल बोंडे काय म्हणाले होते?

'बेडूक किती फुगला तरी हत्ती बनत नाही'. शिंदे चांगले मुख्यमंत्री आहेत. मात्र त्यांना त्याच्या आजूबाजूचे चुकीचे सल्ले देत आहे, शिंदे यांना ठाणे म्हणजे पूर्ण महाराष्ट्र वाटायला लागलाय असं अनिल बोंडे म्हणाले आहेत.(Latest Marathi News)

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.