Supriya Sule: शरद पवारांचा नियम सुप्रिया सुळेंनी मोडला; मटण खाऊन घेतलं देवदर्शन

शिवसेना नेत्याचा सुप्रिया सुळेंवर मोठा आरोप; पुरावाच दिला
Supriya Sule
Supriya Suleesakal
Updated on

राष्ट्रवादीच्या नेत्या आणि खासदार सुप्रिया सुळे वारंवार आपल्या मतदार संघात भेटी दिल्यानंतरचे फोटो व्हिडिओ सोशल मिडियावर शेअर करताना दिसतात. या फोटोमुळे आणि व्हिडिओमुळे राष्ट्रवादीच्या नेत्या सुप्रिया सुळे सध्या एका नव्या वादात अडकल्याच दिसून येत आहेत. त्यांनी मटण खाऊन देवाचं दर्शन घेतल्याचा त्यांच्यावर आरोप होत आहे.

शिवसेनेचे माजी आमदार, माजी मंत्री विजय शिवतारे यांनी सुप्रिया सुळे यांच्यावरती हे गंभीर आरोप केले आहे. सुप्रिया सुळे यांच्या या कृतीमुळे भावना दुखावल्याचा आरोपही शिवतारे यांनी केला आहे. त्याचबरोबर सुप्रिया सुळे यांचा मटण खातानाचा व्हिडीओही शेअर केला आहे. तसेच देवदर्शन घेतानाचे फोटोही शेअर केले आहेत. त्यामुळे राजकीय वर्तुळात रंगताना दिसत आहे. मात्र, शिवतारे यांच्या या आरोपावर सुप्रिया सुळे यांनी त्यावर अद्याप कोणतीही प्रतिक्रिया दिलेली नाही.

खासदार सुप्रिया सुळे यांनी काल मटण खाऊन महादेव मंदिरात जाऊन दर्शन घेतलं, असा गंभीर आरोप शिवसेनचे नेते विजय शिवतारे यांनी केलाय. शिवतारे यांनी सुप्रिया सुळे यांचे मटण थाळी खातानाचे व्हिडिओ आणि फोटो फेसबुकवर पोस्ट करत टीका केली आहे. सुप्रिया सुळे यांनी पुण्यातील एका हॉटेलमध्ये मटण खाल्लं आणि त्यानंतर देवदर्शन केलं आहे. सुप्रिया सुळे यांनी महादेव आणि सासवडला सोपणकाका मंदिरात जाऊन दर्शन घेतलं, असं शिवतारे यांनी आपल्या पोस्टमध्ये म्हटलं आहे. त्यामुळे सुप्रिया सुळेंच्या देवदर्शनावरून नवा वाद निर्माण होण्याची शक्यता जात आहे.

Supriya Sule
CM शिंदेंची 'नायक स्टाईल' कारवाई, दोन डॉक्टरांचे तडकफडकी निलंबन

तर गेल्यावर्षी राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी नॉनव्हेज खाल्ल्याने दगडूशेठ गणपतीचे बाहेरुनच दर्शन घेतलं. नॉनवेज खाल्लं असल्याने मंदिरात बाप्पाच्या दर्शनासाठी न जाता बाहेरुन दर्शन घेतल्याची माहिती राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष प्रशांत जगताप यांनी दिली होती.

पोस्टमध्ये काय म्हटलं आहे विजय शिवतारे यांनी?

विजय शिवतारे यांनी सुप्रिया सुळे यांचा मटण खातानाचा व्हिडीओ शेअर केला आहे. त्यानंतर सुप्रिया सुळे यांच्या फेसबुक पेजवरील देवदर्शनाचे चार फोटो शेअर केले आहेत. तसेच हे फोटो आणि व्हिडीओ शेअर करताना त्यावर कमेंट केली आहे. आधी मटण खाल्लं. मग भैरवनाथ मंदिरात जाऊन दर्शन घेतलं. मग महादेव मंदिरात गेल्या. मग दिवे घाट ओलांडून सासवडला गेल्या. सासवडला संत सोपानकाकांचे दर्शन घेतले. येणेवरे ज्ञान देवो सुखिया जाहला||, अशी टीका शिवतारे यांनी केली आहे.

Supriya Sule
एप्रिल-मेमध्ये ३२,३०० शिक्षकांची भरती! खासगी १७००० तर शासकीय १५००० पदे; ‘टेट’चा निकाल २० मार्चपूर्वी

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.