पुणे : एरव्ही राजकीय मैदानात नेत्यांची फटकेबाजी आपण पाहतोच, पण राजकीय क्षेत्रातील दिग्गजांची क्रिकेटच्या मैदानातली कामगिरी सरकारनामाने आयोजित केलेल्या 'क्रिकेटनामा' या स्पर्धेत आपणाला पहायला मिळत आहे. या दरम्यान शिवसेनेचे सचिव मिलिंद नार्वेकर (Milind Narvekar) यांनी भाजपचे खासदार सुजय विखे पाटील (MP Sujay Vikhe) आणि माझे बोलणे झाले आहे, ते भविष्यात धनुष्यबाण हाती घेतील असा गोप्यस्फोट केलाय.
या क्रिकेट मैदानावर आपल्याला राजकीय फटकेबाजी देखील पाहायला मिळत आहे. शिवसेनेचे मिलिंद नार्वेकर म्हणाले की, या स्पर्धेत सरकारनामा सर्वांना एकत्र आणत आहे, पण ते उद्या असं पण सांगतील की, एकत्र येवून सरकार बनवा पण मुख्यमंत्रीपद पहिल्यांदा आम्हालाच लागेल.
तसेच खासदार सुजय विखे पाटील म्हणाले की, इथे सर्वांचे जर्सीमधील फोटो काढून ठेवा. कारण हे पुढे कायमस्वरुपी याच संघात राहतील का? याची काळजी सरकानामाने घ्यायची आहे. त्यानंतर सुजय विखे पाटलांशी माझे बोलणे झाले आहे, ते भविष्यात धनुष्यबाण हाती घेतील, असे नार्वेकर म्हणाले आहेत.
या स्पर्धेत भाजपकडून अहमदनगरचे युवा खासदार सुजय विखे , आमदार गोपीचंद पडळकर आणि आमदार राम सातपुते अशी तगडी टीम मैदानात उतरली आहे. तसेच स्पर्धेत काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस (ncp), शिवसेना (shivsena), महाराष्ट्र नवनिर्माण सेना (mns), आम आदमी पार्टी या राजकीय पक्षांच्या संघाबरोबरच आयएएस आणि आयपीएस अधिकारीही भाग घेत आहेत.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.