2019 मध्ये त्यांनी जनतेसोबत बेइमानी केली, त्यांनी ही मोठा चपराक आहे. 2019 मध्ये त्यांनी बाळासाहेबांचे विचार विकले आणि काँग्रेसला जवळ करुन सत्ता स्थापन केली.
मुंबई : अवघ्या देशाचं लक्ष लागून राहिलेल्या राज्यातील शिवसेना आमदारांच्या अपात्रताप्रकरणी विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी काल (बुधवार) ऐतिहासिक निकाल दिला. शिंदे अथवा ठाकरे गटापैकी कोणालाच अपात्र ठरविण्यात आलेले नसले, तरीसुद्धा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांचाच गट हा ‘मूळ शिवसेना’ असल्याचा निर्वाळा देत त्यांनी राज्यातील राजकीय अस्थैर्य संपुष्टात आणले. या निकालावर सत्ताधारी गटानं समाधान व्यक्त केलंय.
दरम्यान, विधानसभा अध्यक्षांनी (Rahul Narvekar) दिलेला निर्णय म्हणजे सत्याचा आणि लोकशाहीचा विजय आहे, अशी प्रतिक्रिया मुंबईत दाखल झाल्यानंतर मुख्यमंत्री शिंदेंनी दिलीये. ते रात्री मुंबईत माध्यमांशी बोलत होते.
मुख्यमंत्री शिंदे म्हणाले, विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकरांनी दिलेला आजचा निर्णय सगळ्यांचा आहे. सत्तेत आल्यापासून कायम एकनाथ शिंदेंचं मुख्यमंत्रीपद जाणार असे सारखे बोलले जात होते. परंतु, अजूनही मी सत्तेत कायम आहे. हुकुमशाहीने पक्ष चालवणाऱ्यांना या निर्णयामुळे मोठा झटका मिळाला आहे. हा लोकशाहीचा विजय आहे. महाराष्ट्रातील जनतेचा विजय आहे, असं त्यांनी स्पष्ट केलं.
आजचा जो निर्णय झालेला आहे, तो प्रत्येक ठिकाणी एक माइल स्टोन ठरणार आहे. हा निर्णय जनतेच्या दृष्टीने खूप योग्य आहे. विरोधक कोणालाच मानत नाही. निवडणूक आयोग, न्यायालयाला देखील मानत नाहीत. ते सर्व संस्थांपेक्षा स्वतःला मोठे मानतात. नेहमी स्वतःला मोठे म्हणतात. सुप्रीम कोर्टाला देखील अनेक सल्ले देण्याचं काम त्यांनी केलंय, म्हणून त्यांना ही मोठी चपराक मिळालीये.
2019 मध्ये त्यांनी जनतेसोबत बेइमानी केली, त्यांनी ही मोठा चपराक आहे. 2019 मध्ये त्यांनी बाळासाहेबांचे विचार विकले आणि काँग्रेसला जवळ करुन सत्ता स्थापन केली. बाळासाहेबांच्या विचाराचा वारसा चालवणाऱ्या खऱ्या शिवसेनाला आज न्याय मिळालाय. प्रभू श्रीरामानं 22 जानेवारीच्या अगोदर आशीर्वाद दिला आहे. प्राणप्रतिष्ठापना सोहळ्याच्या आधी निर्णय आल्याने सर्व जनतेला न्याय मिळाला असून आगामी लोकसभा निवडणुकांमध्ये 45 हून अधिक जागा आम्ही जिंकू, असा विश्वासही मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी व्यक्त केला.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.