Shiv Sena MLA Disqualification Case: आमदार अपात्रतेच्या प्रकरणावर आजपासून अंतिम सुनावणी; दोन्ही गटाचे वकील करणार युक्तिवाद

शिवसेना आमदार अपात्रता प्रकरण सुनावणीचे प्रकरण अंतिम टप्पयात आले असून आजपासून त्यासंबधीची सुनावणी सुरू होणार आहे.
Shivsena Mla Disqualification Case
Shivsena Mla Disqualification CaseEsakal
Updated on

९Shiv Sena MLA Disqualification Case: शिवसेना आमदार अपात्रता प्रकरण सुनावणीचे प्रकरण अंतिम टप्पयात आले असून आजपासून त्यासंबधीची सुनावणी सुरू होणार आहे. आजपासून पुढील तीन दिवस (20 डिसेंबरपर्यंत) सुनावणीतील अंतिम युक्तिवाद होणार आहे. शिवसेनेच्या ठाकरे गट आणि शिंदे गटातील आमदारांच्या उलट तपासणीनंतर लेखी युक्तिवाद सादर करण्यात आला. त्यानंतर आता दोन्ही गटांचे वकील विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांच्यासमोर युक्तिवाद करणार आहेत.

शिवसेना आमदार अपात्रता सुनावणी आता अंतिम टप्प्यात असून विधानसभा अध्यक्षांसमोर आजपासून पुढील तीन दिवस ही सुनावणी होणार आहे. या तीन दिवसातील प्रत्येकी दीड-दीड दिवस शिवसेनेच्या ठाकरे गट आणि शिंदे गटाचे वकिल युक्तिवाद करणार आहेत. सुप्रीम कोर्टाने विधानसभा अध्यक्षांना 10 जानेवारीपर्यंत निकाल जाहीर करण्यास सांगितले आहे. त्याआधी प्रकरणाचा निकाल जाहीर करण्यासाठी 31 डिसेंबरची मुदत देण्यात आली होती.

Shivsena Mla Disqualification Case
Nawab Malik: नवाब मलिक अधिवेशनापासून दूर; फडणवीस यांच्या पत्रानंतर फिरविली पाठ

गेल्या दीड वर्षांपेक्षा जास्त काळापासून शिंदे गट विरुद्ध ठाकरे गट यांच्यात सुरू असलेला आमदार अपात्रता प्रकरणाचा निकाल हा 10 जानेवारीपर्यंत लागणार आहे. दरम्यान आजपासून (18, 19 आणि 20 डिसेंबर) अंतिम सुनावणी विधानसभा अध्यक्षांकडून पूर्ण केली जाणार आहे. शिवसेना ठाकरे गटाकडून अॅड. देवदत्त कामत आणि शिंदे गटाकडून अॅड. महेश जेठमलानी हे युक्तिवाद करणार आहेत.

Shivsena Mla Disqualification Case
MIHAN Project: 'मिहानमध्ये येत्या तीन वर्षांत १ लाख युवकांना रोजगार', नितीन गडकरी यांचं महत्वाचं विधान

3 दिवस अंतिम सुनावणी

विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांच्यासमोर आजपासून तीन दिवस आमदार अपात्रता प्रकरणाच्या अंतिम सुनावणीला सुरु होणार आहे. सकाळी 8 वाजून 30 मिनिटांनी सुनावणीला सुरुवात होईल. तर दुपारी अध्यक्षांच्या कामकाजातील वेळेनुसार दुसऱ्या सत्रातील अंतिम सुनावणी पार पडणार आहे.

लेखी युक्तिवाद पूर्ण झाल्यानंतर आता अंतिम सुनावणी सुरू होत आहे. ही सुनावणी पार पडल्यानंतर 10 जानेवारीपर्यंत या प्रकरणात विधानसभा अध्यक्ष विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर निकाल देतील. या प्रकरणी 10 जानेवारीपर्यंत निकाल देण्याची मुभा सर्वोच्च न्यायालयाने दिलीय. त्यानुसार 10 जानेवारीपर्यंत निकाल अपेक्षित आहे.

Shivsena Mla Disqualification Case
४ जिल्ह्यांची जानेवारीपासूनच वाढणार चिंता! उजनीतील साठा ५ जानेवारीलाच होणार मायनस; सोलापूरला २५ डिसेंबरनंतर तर जानेवारीत शेतीला पाणी

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.