शिवसेना कोणाची? आमदार अपात्रतेप्रकरणी विधानसभा अध्यक्षांसमोर आज दुसरी सुनावणी, विधिमंडळाकडून ५४ सदस्यांना नव्याने नोटीस

शिवसेना आमदारांची आज दुसरी सुनावणी पार पडणार आहे
MLA Disqualification Case
MLA Disqualification CaseEsakal
Updated on

शिवसेना आमदारांच्या अपात्रतेबाबतच्या याचिकांची आज (सोमवारी) सुनावणी होणार असून महाराष्ट्र विधिमंडळाच्यावतीने दोन्ही गटांतील ५४ आमदारांना नव्याने नोटीस बजावून आज(ता. २५) दुपारी तीन वाजता विधानभवनात सुनावणीसाठी बोलावले आहे. अपात्रतेसंबंधीच्या पूर्वीच्या सर्व याचिका एकत्र करून ही नोटीस जारी करण्यात आली आहे.

‘अपात्रतेसंबंधीच्या याचिका क्रमांक १ ते ३४/२०२२ यांची सुनावणी विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांच्यासमोर आज (सोमवारी) दुपारी तीन वाजता विधानसभेच्या मध्यवर्ती सभागृहात होणार असून आपण यावेळी उपस्थित राहावे,’ असे नोटिशीत म्हटले आहे. सुनावणीच्या कामी गरज पडल्यास दोन्ही गटांचे प्रमुख उद्धव ठाकरे आणि एकनाथ शिंदे यांनाही बोलाविण्यात येणार असल्याचे राहुल नार्वेकर यांनी सांगितले.

MLA Disqualification Case
Pune Accident News : पुण्यात भरधाव कारने पाच शेतमजूरांना चिरडलं! तिघांचा मृत्यू तर दोघे गंभीर जखमी

एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली अनेक आमदार भाजपच्या बरोबर गेल्यानंतर शिवसेनेत फूट पडली आहे. त्यानंतर ठाकरे गटाकडून शिंदेंना पाठिंबा दिलेल्या आमदारांच्या विरोधात याचिका दाखल करण्यात आली. या आमदारांना अपात्र ठरवण्यात यावे, अशी मागणी या याचिकेत करण्यात आली होती.

MLA Disqualification Case
Weather Update: आगामी 3 दिवसात राज्यात मुसळधार पावसाचा अंदाज, हवामान विभागाचा 'या' जिल्ह्यांना यलो अलर्ट

तर दुसरीकडे निवडणूक आयोगाने शिंदे यांना पक्षाचे नाव आणि चिह्न दिल्यानंतर शिंदे समर्थक आमदारांकडून देखील याचिका दाखल करण्यात आली होती. मात्र अध्यक्षांकडून याचिकांच्या सुनावणीबाबत ठोस कारवाई होत नसल्याची तक्रार करणारी याचिका शिवसेना (उद्धव ठाकरे गट) पक्षाने सर्वोच्च न्यायालयात केली होती. त्यावर गेल्या आठवड्यात सुनावणी करताना सर्वोच्च

न्यायालयाने विधानसभा अध्यक्षांना कालमर्यादेत सुनावणी घेण्यासंदर्भात स्पष्ट निर्देश दिले होते. त्यानंतर आता विधानसभा अध्यक्षांसमोर या प्रकरणात प्रत्यक्ष सुनावणीला सुरुवात झाली आहे.

MLA Disqualification Case
विधी व अभियांत्रिकी विद्यार्थ्यांसाठी खुषखबर! प्रथम वर्षाचे निम्मे विषय राहिले, तरी मिळणार तृतीय वर्षाला प्रवेश; विद्या परिषदेची आज बैठक

14 सप्टेंबरला झालेल्या पहिल्या सुनावणीनंतर सर्वोच्च न्यायालयाच्या निर्देशानुसार आज या प्रकरणातील दुसरी सुनावणी घेतली जात आहे. विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी या सुनावणीआधी दिल्लीमध्ये कायदेशीर बाबी समजून सल्ला घेतल्याची माहिती आहे.

मागील सुनावणीत काय झाले?

14 सप्टेंबरला झालेल्या सुनावणीमध्ये शिंदे आणि ठाकरे गटाला कागदपत्रे एकमेकांना देण्यास सांगण्यात आले होते. शिवाय, दहा दिवसांमध्ये याचिकाकर्त्यांनी दाखल केलेल्या याचिकेवर शिवसेना शिंदे गटातील आमदारांना उत्तर देण्यासाठी वेळ देण्यात आलेला होता.

गेल्या आठवड्यामध्ये विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी दिल्ली दौरा केला आहे. या दौऱ्यावेळी त्यांनी काही कायदे तज्ज्ञांचा या सगळ्या प्रकरणात सल्ला घेतल्याची चर्चा केली असल्याची त्यांनी सांगितलं आहे.

MLA Disqualification Case
झेडपीच्या ८००० शाळांना लागणार टाळे! राज्यातील कमी पटसंख्येच्या शाळांवर टांगती तलवार; तेथील शिक्षकांचे काय होणार, वाचा...

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()