मुंबईः शिवसेना आमदार अपात्रतेसंबंधी बुधवारी चार वाजता महत्त्वपूर्ण निकाल येणार आहे. विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर विधानभवनामध्ये दाखल झालेले आहेत. दुपारी चार वाजेपर्यंत आमदार अपात्रतेसंबंधी निकाल येणं अपेक्षित आहे. अपात्रतेची कारवाई शिंदे गटावर होते की ठाकरे गटातील आमदारांवर, हे कळेलच.
विशेष म्हणजे विधानभवनात पोहोचण्यापूर्वी विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी राज्यघटनेच्या अनुसूची १० मधील कलमांचा योग्य वापर करणार असल्याचं म्हटलं आहे. आज निर्माण झालेली परिस्थिती यापूर्वी कधीच निर्माण झाली नसल्याने ज्या कायद्यांचं इंटरपिटीशन आजपर्यंत झालेलं नव्हतं त्यांचा योग्य वापर करणार असल्याचं म्हटलं आहे.
दरम्यान, संजय राऊत यांनी मुख्यमंत्र्यांचा दावोस दौरा आणि पंतप्रधानांचा रोड शो.. या मुद्द्यांचा आधार घेऊन निकाल काय येईल, यासंबंधीच तर्क लावला आहे. ''आज घटनाबाह्य सरकारचा निकाल लागणार आहे, निर्णय दिल्लीतून झालेला आहे.. फक्त शिक्का मारणं बाकी आहे. मुख्यमंत्री दावोसला जाणार आहेत, प्रधानमंत्री रोडशोच्या दौऱ्यावर येत आहेत; मुख्यमंत्री दावोसला जात आहेत, कारण त्यांना निर्णय माहित आहे.'' असा अंदाज राऊतांनी बांधला.
संजय राऊत पुढे म्हणाले की, जेव्हापासून क्रिकेटमध्ये जुगार आला तेव्हापासून 'मॅच फिक्सिंग' हा शब्द आपल्या कानावर सातत्याने पडतोय.. त्याच्यावर चर्चा होतेय. दीड वर्षांपासून महाराष्ट्रामध्ये बेकायदेशीर घटना घडत आहेत. सर्वोच्च न्यायालयाने स्पष्टपणे काही निर्देश देऊनसुद्धा विधानसभा अध्यक्षांनी सुनावणी देण्यास चालढकल केली.
''राहुल नार्वेकर हे न्यायदानाच्या खुर्चीवर बसले आहेत, ते तटस्थ राहिले पाहिजेत. त्यांचा प्रोटोकॉल असं सांगतो की, एखाद्या कामासंदर्भात सूचना देण्यासाठी विधानसभा अध्यक्ष मुख्यमंत्र्यांकडे जात नाहीत. पण हे मेसेज डेट आणि मॅच फिक्सिंगसाठी मुख्यमंत्र्यांच्या केबिनमध्ये जातात.'' असा आक्षेप राऊतांनी घेतला.
काय म्हणाले संजय राऊत?
शिंदे गटाने नेमलेला व्हीप हा बेकादेशीर आहे
नाईलाजाने औपचारिकता म्हणून आज निर्णय दिला जाणार आहे
निर्णयाची मॅच फिक्सिंग दिल्लीतून झालेली आहे
मुख्यमंत्र्यांचा दावोस दौरा फायनल झाल्याने निर्णयाचा अंदाज येतोय
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.