Shivsena Mla Disqualification Case : आमदार अपात्रतेच्या सुनावणीच्या घडामोडींना वेग! अंतिम सुनावणीच्या तारखेबाबत मोठी अपडेट आली समोर

शिवसेना आमदारांच्या अपात्रतेबाबतच्या सुनावणीबाबत मोठी माहिती समोर आली आहे
Shivsena Mla Disqualification Case
Shivsena Mla Disqualification CaseEsakal
Updated on

शिवसेना आमदारांच्या अपात्रतेबाबतच्या सुनावणीबाबत मोठी माहिती समोर आली आहे. शिवसेना आमदारांच्या अपात्रतेच्या सुनावणीचे वेळापत्रक ठरल्याची माहिती समोर आली आहे. 13 ऑक्टोबरला शिवसेनेच्या आमदारांच्या सर्व याचिका एकत्र करायच्या कि नाही, यावर सुनावणी पार पडणार आहे. अपात्रतेची सुनावणी नोव्हेंबरपर्यंत चालणार असून सर्व याचिकांवरील सुनावण्यात एकत्रित घ्यायच्या की नाही, याबाबत 20 ऑक्टोबरला मोठा निर्णय होण्याची शक्यता आता वर्तण्यात येत आहे.

13 ऑक्टोबर ते 20 ऑक्टोबर दरम्यान कागदपत्रांची तपासणी होणार आहे, यानंतर 23 नोव्हेंबरदरम्यान युक्तीवाद करण्यात येईल, त्याचबरोबर 23 नोव्हेंबरनंतर दोन आठवड्यात अंतिम सुनावणी होईल, अशी माहिती समोर आली आहे.सर्वोच्च न्यायालयाने ताशेरे ओढल्यानंतर आणि नाराजी व्यक्त केल्यानंतर विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी 25 सप्टेंबर रोजी आमदार अपात्रतेची दुसरी सुनावणी घेतली होती.

दरम्यान शिवसेना ठाकरे गटाकडून सर्व याचिकांवर एकत्रित सुनावणी घ्या, अशी मागणी करण्यात आली आहे. तर आमदारांची सुनावणी वेगवेगळी घेण्यात यावी, अशी मागणी शिंदे गटाकडून करण्यात आलेली आहे.

Shivsena Mla Disqualification Case
शिवसेना कोणाची? आमदार अपात्रतेप्रकरणी विधानसभा अध्यक्षांसमोर आज दुसरी सुनावणी, विधिमंडळाकडून ५४ सदस्यांना नव्याने नोटीस

दोन्ही बाजूंचा युक्तीवाद ऐकल्यानंतर आता विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी सुनावणीचे वेळापत्रक निश्चित केल्याची माहिती समोर आली आहे. आमदार अपात्रतेची सुनावणी नोव्हेंबरपर्यंत चालणार असल्याची माहिती समोर येत आहे. आमदार अपात्र प्रकरणाला आता वेग आला असून लवकरच निर्णय लागण्याची शक्यता आहे. यासंबधीचे वृत्त 'साम टिव्ही'ने सुत्रांच्या हवाल्याने दिले आहे.

Shivsena Mla Disqualification Case
Fire Accident: लग्न समारंभात लागलेल्या आगीत १०० जणांचा दुर्दैवी मृत्यू; तर नववधू, वरासह १५० जण जखमी

शिवसेना आमदारांच्या अपात्रतेच्या सुनावणीचे वेळापत्रक

13 ऑक्टोबर ते 23 नोव्हेंबर दरम्यान चालणार युक्तिवाद

23 नोव्हेंबरनंतर दोन आठवड्यात होणार अंतिम सुनावणी

13 ऑक्टोबरला सर्व याचिका एकत्र करायच्या की नाही? यावर सुनावणी पार पडेल

20 ऑक्टोबरला सर्व याचिकांवर एकत्रित सुनावणी घ्यायची की नाही याचा निर्णय.

13 ते 20 ऑक्टोबर दरम्यान दोन्हीही गटांनी एकमेकांना दिलेली कागदपत्रांची विधिमंडळ तपासणी करेल.

Shivsena Mla Disqualification Case
Rain Update : ढगफुटीसदृश पावसाने कोल्हापूर, दाजीपूरला झोडपले; पाच तासांत 137 मिलिमीटर पावसाची नोंद, आजही मुसळधार?

20 ऑक्टोबर रोजी सर्व याचिका एकत्रित करायच्या की नाही यावर निकाल दिला जाईल.

याशिवाय 20 ऑक्टोबरला काही अधिकची कागदपत्र एखाद्या गटाला सादर करायची असतील, तर त्यासाठी संधी दिली जाईल.

27 ऑक्टोबरला दोन्हीही गट आपापलं म्हणणं (स्टेटमेंट) मांडतील.

6 नोव्हेंबर पर्यंत दोन्ही गट आपापले मुद्देसूद मांडणी करतील व दावे आणि प्रतिदावे करतील.

10 नोव्हेंबरला दोन्ही गटांनी मांडलेल्या मुद्द्यांच्या अनुषंगाने सुनावणी पार पडेल.

20 नोव्हेंबरला दोन्ही गटांच्या साक्षीदारांची यादी सादर केली जाईल.

23 नोव्हेंबरला साक्षीदारांची उलट साक्ष घेतली जाईल.

सर्व पुरावे तपासल्या नंतर पुढील दोन आठवड्यात अंतिम सुनावणी पार पडेल.

Shivsena Mla Disqualification Case
Sakal Podcast : दुकानांच्या पाट्या मराठीत व्हायलाच हव्यात ते प्रफुल्ल पटेल खोटं बोलतायत

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.