पुन्हा ठाकरेंना धक्का बसणार? शिवसेना अपात्रता प्रकरणात मोठी अपडेट आली समोर; दोन दिवसात येणार निकाल

शिवसेना आमदार अपात्रतेचा निकाल काय लागणार याकडे राज्यासोबतच संपूर्ण देशाचे लक्ष लागले आहे, या निकालानंतर राज्यात पुन्हा खळबळ उडण्याची शक्यता आहे.
Rahul Narvekar On Shivsena Mla Disqualification Case
Rahul Narvekar On Shivsena Mla Disqualification CaseEsakal
Updated on

शिवसेना आमदार अपात्रतेचा निकाल काय लागणार याकडे राज्यासोबतच देशाचे लक्ष लागले आहे. विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर हे या प्रकरणी निकाल देणार असून येत्या दोन दिवसात निकाल दिला जाणार आहेत.शिवसेनेच्या उद्धव ठाकरे यांनी एकनाथ शिंदे गटातील आमदारांना अपात्र ठरवण्याची मागणी केली आहे, त्यामुळे त्यांच्या बाजूने निकाल आला तर पुन्हा राज्यात राजकीय भूकंपाची शक्यता आहे.

उद्धव ठाकरे गटाने या प्रकरणात शिंदे यांना अपात्र ठरविण्याची मागणी केली असली तरी, एकनाथ शिंदे यांनाच याप्रकरणी दिलासा मिळेल, असेच संकेत सध्या मिळत आहेत. अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी त्यांच्या निकालपत्राचा मसुदा कायदेशीर अभिप्रायासाठी दिल्लीतील कायदेतज्त्रांकडे पाठविला असल्याची माहिती समोर आली आहे. निवडणूक आयोगाने शिवसेनेतील वादात शिंदे गटाच्या बाजूने कौल दिला होता. त्यामुळे विधानसभा अध्यक्षांकडून निवडणूक आयोगाच्या आदेशाचाही आधार घेण्यात आल्याचे समजते.

Rahul Narvekar On Shivsena Mla Disqualification Case
Ajit Pawar : सत्तेत सहाभागी होण्यात कुठलाही वैयक्तिक स्वार्थ नव्हता, मोदींना तिसऱ्यांदा... ; अजित पवारांचं वक्तव्य

दरम्यान एकनाथ शिंदे गटाने शिवसेना एकच आहे, फक्त आम्ही शिवसेनेत नेतृत्व बदल केल्याचा दावा केला आहे आणि या मुद्द्यांचा आधारे शिंदे यांना अपात्रता प्रकरणात दिलासा मिळू शकतो, असे सूत्राकडून सांगण्यात येत आहे. त्यामुळे पुन्हा एकदा उद्धव ठाकरे यांना धक्का बसण्याची शक्यता आहे.

Rahul Narvekar On Shivsena Mla Disqualification Case
PM Modi : मालदीवला मोठा झटका! EaseMyTrip ने सस्पेंड केल्या सर्व फ्लाइट्स बुकिंग; PM मोदींवरील टिप्पणी चांगलीच भोवली

निकाल शिंदेंच्या विरोधात लागला तर?

अपात्रता प्रकणाचा निराल एकनाथ शिंदे गटाच्या विरोधात लागला तर एकनाथ शिंदे यांना मुख्यमंत्रीपद सोडावे लागू शकते. मात्र यापूर्वीच शिंदे गटाच्या विलिनीकरणाची भाजपकडून रणनीती आखली जात असल्याचे बोलले जात आहे. शिवसेना आमदार अपात्रतेचा निकाल देताना विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी शिंदे गटातील १६ आमदारांना अपात्र ठरवल्यास भाजपने हा प्लॅन बी तयार ठेवल्याची चर्चा आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.