Santosh Bangar : कावड यात्रेत फिरवली तलवार! शिवसेना आमदार बांगरांवर गुन्हा दाखल

Santosh Bangar
Santosh BangarSakal
Updated on

हिंगोली : उद्धव ठाकरे यांच्या सभेला उत्तर देण्यासाठी हिंगोलीतील कळमनुरी येथील शिवसेनेचे आमदार संतोष बांगर यांनी कावड यात्रा काढली होती. या यात्रेला कार्यकर्त्यांची चांगलीच गर्दी जमली होती. यावेळी बांगर यांनी हातात तलवार दाखवत शक्ती प्रदर्शन केल्या प्रकरणी कळमनुरी पोलिसांनी त्यांच्यावर गुन्हा दाखल केला आहे.

कळमनुरी शहरामध्ये निघालेल्या कावड यात्रेत शिवभक्ताने आमदार संतोष बांगर यांचा सत्कार करत त्यांना तलवार दिली होती. ही तलवार संतोष बांगर यांनी म्यानातून काढून समुदायाला दाखवत शक्तीप्रदर्शन केलं होतं.

याप्रकरणी कळमनुरी पोलिस स्टेशनमध्ये त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलिसांची परवानगी न घेता डीजे लावला असेही पोलिसांनी दाखल केलेल्या तक्रारीत म्हटले आहे. त्यामुळे बांगर यांच्या अडचणीत वाढ झाली आहे.

Santosh Bangar
Swami Chakrapani : 'चंद्राला हिंदू राष्ट्र घोषित करा' म्हणणारे स्वामी दाऊदच्या कारमुळे झाले होते फेमस

दरम्यान, उद्धव ठाकरे यांनी हिंगोलीत सभा घेऊन शिंदे गटावर जोरदार टीका केल्यानंतर आमदार संतोष बांगर यांनी काल कावड यात्रा काढत शक्तीप्रदर्शन केलं. त्यांच्या या यात्रेला गावागावांतून आलेले अनेक कार्यकर्ते उपस्थित होते. ठिकठिकाणी कार्यकर्त्यांनी त्यांचे हार घालून स्वागत केले. त्याचबरोबर कार्यकर्ते आणि आमदार बांगर यांनीसुद्धा डीजेच्या तालावर ठेका धरल्याचं पाहायला मिळालं. यावेळी बांगर यांनी तलवार दाखवत प्रदर्शन केले होते.

सोमवारच्या निमित्ताने महादेवाचा अभिषेक आणि रूद्राक्षांच्या माळा

काल श्रावण महिन्यातील सोमवार असल्यामुळे त्यांनी कावड यात्रा काढत महादेवाचा अभिषेक केला. त्याचबरोबर त्यांनी आपल्या अंगावर भगवे कपडे नेसत गळ्यात आणि दंडावर रूद्राक्षांच्या माळा घातल्या होत्या. त्यांच्या नवीन लूकने सर्वांचे लक्ष वेधून घेतले होते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.