मुंबई: माजी खासदार आणि भाजपा नेते किरीट सोमय्या (kirit somaiya) यांनी आज राज्यपालांची भेट घेऊन हसन मुश्रीफ (hasan mushrif) यांच्या विरोधात राज्यपालांकडे (governer) तक्रार केली आहे. राज्यातील पोलिसांनी 19 सप्टेंबरला उद्धव ठाकरे (uddhav thackeray) यांचे माफिया म्हणून काम केलं. याची मानव अधिकार आयोगात तक्रार करणार असल्याचे किरीट सोमय्या यांनी म्हटलं आहे. पोलिसांचा गुंड म्हणून उपयोग करत मला घरात डांबून ठेवण्यात आलं, असं किरीट सोमय्या यांनी सांगितलं.
भावना गवळींवर काय आरोप केले?
शिवसेनेच्या भावना गवळी यांनी 100 कोटींचा घोटाळा केल्याचा आरोप त्यांनी केला. "भावना गवळी यांनी स्वतः 7 कोटींची चोरी केली आहे. साडे अठरा कोटी लंपास केले. पतसंस्थांच्या बोगस इंटऱ्या करून घेतल्या आहेत. मात्र पोलिसांनी सामान्य नागरिकांच्या विरोधात तक्रार दाखल केली" असे किरीट सोमय्या म्हणाले.
"गवळी यांनी स्वतः 7 कोटी ची चोरी केली आहे. गवळी याच्या संस्थेत बोगस नोंदी केल्या आहेत. भावना गवळी यांना अटक करावी अशी मी मागणी करत आहे. माझ्यावर झालेला हल्ला भावना गवळी आणि सईद खान यांनी केला आहे" असा आरोप सोमय्यांनी केला.
"शरद पवार आणि उद्धव ठाकरे यांनी अनिल देशमुख यांना वाचविण्याचे काम सोडावे. शरद पवार आणि मुख्यमंत्र्यांनी अनिल देशमुख यांना लपवणे बंद करावे" असे सोमय्या म्हणाले.
हसन मुश्रीफांवर काय आरोप केला?
10 मार्च 2021 ला आदेश निघाला. मुश्रीफांनी स्वतः च्या जावयाला कंत्राट दिले. हसन मुश्रीफ यांनी 1500 कोटीचा ग्रामविकास खात्यात घोटाळा केला आहे असा आरोप किरीट सोमय्या यांनी केला. मुश्रीफ यांनी स्वतःच्याच जावयाला अनधिकृत रित्या कंत्राट दिले आहे, त्याची चौकशी झाली पाहिजे अशी मागणी सोमय्या यांनी केली. हसन मुश्रीफ यांची पहिली नोटीस मला मिळाली आहे पण मी घाबरत नाही, अजूनही घोटाळे बाहेर काढणार असं सोमय्या म्हणाले.
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.