Ravindra Waikar : महाराष्ट्र सदनात खासदारांनाच मिळेनात सुविधा! वायकरांनी वाचला गैरसोयींचा पाढा; थेट मुख्यमंत्र्यांना लिहीलं पत्र

Ravindra waikar wrote letter to CM Shinde about Maharashtra Sadan : शिवसेना शिंदे गटाचे नवनिर्वाचित खासदार रविंद्र वायकर यांनी राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना पत्र लिहीलं आहे.
Shivsena MP ravindra waikar wrote letter to CM Shinde to improve the facilities in Maharashtra Sadan Marathi News
Shivsena MP ravindra waikar wrote letter to CM Shinde to improve the facilities in Maharashtra Sadan Marathi News
Updated on

शिवसेना शिंदे गटाचे नवनिर्वाचित खासदार रविंद्र वायकर यांनी राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना पत्र लिहीलं आहे. या पत्रात त्यांनी दिल्लीच्या नवीन महाराष्ट्र सदनातील व्यवस्थेवर बोट ठेवलं आहे.

वायकर यांनी नवीन महाराष्ट्र सदनातील खोल्यांच्या व्यवस्थेबाबत तसेच येथील कँटीनमधून मिळणाऱ्या खाद्य पदार्थांवर देखील प्रश्न उपस्थित केला आहे. महाराष्ट्र सदनात मिळणा-या खादय पदार्थांचा दर जास्त असून पदार्थांचा दर्जा देखील चांगला नसल्याची तक्रार वायकर यांनी केली आहे.

महाराष्ट्र सदनातील सुविधांमध्ये सुधारणा करण्याची मागणी त्यांनी पत्रातून केली आहे. मात्र सत्ताधारी पक्षाच्या खासदारावर महाराष्ट्र सदनाच्या व्यवस्थेबाबत पत्र लिहिण्याची वेळ आल्याने राजकीय वर्तुळात चर्चा सुरू झाल्या आहेत.

'महाराष्ट्र सदनातील सुविधांमध्ये सुधारणा करण्याबाबत' असे म्हणत लिहिण्यात आलेल्या या पत्रात वायकरांनी पाच वेगवेगळे मुद्दे उपस्थित केले आहेत. यामध्ये संगणक, गरम पाणी, वाय-फायची सुविधा, कॅन्टीनमधील खाद्यपदार्थांचे दर इत्यादी मुद्दे त्यांनी मांडले आहेत.

Shivsena MP ravindra waikar wrote letter to CM Shinde to improve the facilities in Maharashtra Sadan Marathi News
Eknath Shinde : "माझी हत्या झाली तरी चालेल, पण एकनाथ शिंदेंना सोडणार नाही", सेना आमदाराचा रोख कोणाकडे?

महाराष्ट्र शासनाने दिल्ली या ठिकाणी उत्कृष्ट असे 'महाराष्ट्र सदन' उभारले आहे, यात जवळपास १३२ खोल्या आहेत. अधिवेशनाच्या काळात, तसेच अन्य कामानिमित्त महाराष्ट्र कानाकोप-यातून लोक या ठिकाणी वास्तव्यास येतात. महाराष्ट्र सदनाची वास्तू जरी चांगली असती तरी या सदनामध्ये काही सुविधांमध्ये सुधारणा करणे आवश्यक आहेत, असे वायकर म्हणाले आहेत.

1. या ठिकाणी फक्त खासदारांसाठी वेगळा सेल असणे आवश्यक आहे. जेणेकरुन या ठिकणी मा. खासदार तसेच त्यांचे स्वीय सहायक शासकीय पत्र व्यवहारांची कामे करण्यासाठी येऊ शकतात, सदनामध्ये असणा-या खासदारांची संख्या व खासदार कक्षात असणारी संगणकांची संख्या ही अपुरी असून, त्यात वाढ करणे, तसेच आधुनिक पध्दतीचे संगणक व प्रिंटरची व्यवस्था करणे आवश्यकता आहे. त्याचबरोबर खासदारांच्या पत्र व्यवहाराची कामे वेगाने करुन देण्यासाठी मराठी, हिंदी व इंग्रजी या भाषेवरील टंकलेखनावर प्रभुत्व असणा-या कर्मचा-यांची नेमणूक होणे आवश्यक आहे.

2. या सदनामध्ये वाय-फायची सुविधा तर देण्यात आली आहे, परंतू त्याचा दर्जा चांगला नसल्याने खोलीच्या आतमध्ये मोबाईलला रेंज मिळत नाही. त्यामुळे आलेले फोन घेताना व करताना, त्याचबरोबर मोबाईल, लॅपटॉपवर काम करताना, वाय-फायचे कनेक्शन व्यवस्थित मिळत नसल्याने काम करताना अनेक अडचणींचा सामना करावा लागत्तो.

Shivsena MP ravindra waikar wrote letter to CM Shinde to improve the facilities in Maharashtra Sadan Marathi News
Telegram CEO Pavel Durov : टेलीग्रामच्या सीईओची 12 देशात 100हून अधिक 'मुलं'; स्वतःच केला खळबळजनक खुलासा

3. महाराष्ट्र सदनामध्ये उपहार गृहाची जी व्यवस्था करण्यात आली आहे. त्यामध्ये मिळणा-या खादय पदार्थांचा दर ही जास्त असून, पदार्थांचा दर्जाही चांगला नाही. नागपूर येथील आमदार निवासातील उपहारगृह मधील पदार्थाचे दर व 'महाराष्ट्र सदन' उपहारगृहातील खादयपदार्थाचे दर यात मोठ्या प्रमाणात तफावत आहे. या सर्वांचा विचार करुन सुधारणा होणे अपेक्षित आहे.

4. पावसाळ्यात काही वेळा अधिका-यांच्या आदेशावरुन सदनातील खोल्यांमध्ये नळाद्वारे मिळणा- या गरम पाण्याची व्यवस्था बंद ठेवण्यात येते. अशावेळी महाराष्ट्र सदनांच्या खोल्यांमध्ये राहणा- यांना थंड पाण्याने आंघोळ करावी लागते. त्यामुळे अधिकारी यांनी आदेश दिल्यानंतर जर गरम पाण्याची व्यवस्था बंद करण्यात येत असेल तर सदनातील खोल्यांमध्ये राहणा-यांना गरम पाणी मिळावे यासाठी पर्यायी व्यवस्था करणे आवश्यक आहे.

5. सदनाच्या खोल्यांमधील पलंगावरील गादया, फर्नीचर ह्या जुन्या झाल्या असून, त्या बदलणे त्याचप्रमाणे नळाला येणारे पाणी पूर्णतः शुध्द मिळणे आवश्यक आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.